अबब…बिग बॉसच्या एका एपिसोडसाठी इतकं मानधन घेतात महेश मांजरेकर, आकडा ऐकून थक्क व्हाल..

0

मराठी आणि हिंदी सिनेमासृष्टीत आपल्या भारदस्त अभिनय आणि दिग्दर्शन कौशल्याने आपली छाप सोडलेले आणि वास्तव, अस्तित्व, विरूद्ध अशा दर्जेदार सिनेमांचं दिग्दर्शन करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे महेश मांजरेकर.. त्यांनी आजवर मराठी चित्रपटसृष्टीलाही भरभरून दिलं. नटसम्राट, काकस्पर्श, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, दे धक्का अशा सुपरहिट सिनेमांसाठी त्यांना ओळखलं जातं.

छोटया पडद्यावर ‘बिग बॉस’ अशी त्यांची ओळख प्रस्थापित झाली आहे. लवकरच ‘बिग बॉस मराठी’चा चौथा सीझन ते घेऊन येणार आहेत.बिग बॉस मराठी’ला महेश मांजरेकर यांनी खास ओळख दिली. त्यांच्या सूत्रसंचलनाच्या कडक आणि हटके स्टाईलने प्रेक्षकांची मनं जिकंली. बिग बॉस मराठीची तिन्ही पर्व त्यांनी गाजवली. दर आठवड्याच्या शेवटी मांजरेकर यांनी स्पर्धकांची घेतलेले शाळा प्रेक्षक आजही आठवतात. ते अनेकजण तर केवळ त्यांनी स्पर्धकांची घेतलेली शाळा बघण्यासाठी खास बिग बॉस मराठी हा शो पाहतात. पण या शोसाठी महेश मांजरेकर किती मानधन घेतात ठाऊक आहे का?

बिग बॉस मराठीच्या एका एपिसोडसाठी ते तब्बल २५ लाख रुपये मानधन घेतात. म्हणजे, एकूण मानधनाचा विचार केला तर ते कोटींच्या घरात आहे. हे आकडे आधीच्या सीझनचे आहे. आगामी सीझनच्या त्यांच्या मानधनात वाढ झाली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे. अर्थात या मानधनाबद्दल कोणीतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. महेश यांचं नेट वर्थ हे जवळपास ४० कोटींच्या घरात असल्याचं सांगितलं जातं. महेश प्रत्येक सिनेमासाठी ३०-५० लाख रुपये आकारतात असं सुद्धा सांगितलं जातं आहे.

दरम्यान, त्यांनी आपल्या वयाची ६४ वर्षे पूर्ण केली. अभिनायची आवड जपणारा मुलगा ते दिग्गज कलाकार हा त्यांचा प्रवास वर्णनीय आहे. महेश मांजरेकर यांची लहानपणापासूनच अभिनयाकडे ओढ होती. मांजरेकर यांनी कॉलेजमध्ये असतानाच थिएटर करायला सुरुवात केली. १९८४ साली अफलातून या बहुचर्चित मराठी नाटकातून त्यांनी अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या नाटकातील त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी चांगली दाद दिली. महेश मांजरेकर यांनी ‘ऑल द बेस्ट’, ‘ध्यानीमनी’, ‘गिधाडे’ ही नाटकंही केली आहेत. अभिनयाची त्यांची आवड आणि उत्सुकता त्यांना चित्रपट उद्योगाकडे घेऊन गेली आणि तिथे त्यांनी सर्वांगीण यश मिळवून अनेकांची मने जिंकली.

गेल्या ३ दशकांहून अधिक काळापासून मराठी सिनेजगत असो वा बॉलिवूड गाजवणारे महेश मांजरेकर यांची आतापर्यंतची कामगिरी त्यांच्या यशस्वी कारकिर्दीला अधोरेखीत करणारी आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या महेश मांजरेकरांनी खूप कष्ट घेतले आहे. अभिनयासोबतच या माणसाने उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून विशेष स्थान मिळवले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप