महेश बाबूची लेक सितारावर होत आहे कौतुकाचा वर्षाव! सोशल मीडियावर तुफान वायरल झालाय तिचा ‘हा’ व्हिडिओ!

साउथ सिनेमा इंडस्ट्री मधील महेश बाबू हा त्यांच्या चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला असला तरी, त्याची मुलगी सितारा हे सुद्धा यात मागे नाही! आपली आई प्रसिद्ध अभिनेत्री नम्रता शिरोडकर सारखीच सुंदर आणि वडील महेश बाबू सारखी सुपर टॅलेंटेड असल्याने सितारा देखील सध्या सोशल मीडियावर जाम चर्चेत आलेली आहे!

 

आजच्या काळात महेश बाबू हा साउथ इंडस्ट्री मधील किती मोठा स्टार आहे हे कुणालाही वेगळे सांगण्याची गरज नाही. तिकडे तर तो त्याच्या चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनलेला आहे, पण त्याची मुलगी सितारा सुद्धा टॅलेंट मध्ये कमी नाही!

नम्रता आणि महेश बाबू सारखीच हुशार असणारी त्यांची मुलगी सितारा हिचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या मागचे कारण म्हणजे एका रियालिटी शोमध्ये तिने केलेला डान्स!

‘डान्स इंडिया डान्स तेलगू’ या रियालिटी शो दरम्यान महेश बाबू आणि त्याची मुलगी सितारा घट्टामनेनी हिच्या सोबत पोहोचलला. यावेळी एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर सितारा म्हणजे आपल्या मुलीला डान्स करताना पाहून महेश बाबूच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहात होता. एकाच वेळी आनंद आणि कौतुक मिश्रित भावना त्याच्या चेहऱ्यावर दिसून आलेल्या.

‘डान्स इंडिया डान्स तेलगू’ या रिॲलिटी शो चा हा एपिसोड झी तेलगू वर येत्या रविवारी रात्री ९ वाजता प्रदर्शित होणार आहे. याचाच एक प्रमुख प्रोमो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये महेश बाबू आपल्या लेकीचा हात हातात घेऊन रेड कार्पेटवर चालताना दिसत आहे. दोघेही अगदी ग्रँड एंट्री करत स्टेजवर पोहोचतात. यावेळेस सितारा देखील इतर स्पर्धकांसोबत डान्स करते आणि यावेळी महेश बाबू आपल्या मुलीला डान्स करताना कौतुक भरलेल्या नजरेने न्याहाळताना दिसत आहे.

साउथ कडील सुपरस्टार असलेल्या महेश बाबूची लेक सितारा देखील तिकडे बरीच फेमस आहे. ती तिच्या सोशल मीडिया हॅण्डल वरून देखील बरीच सक्रिय असलेली दिसते. तिचे स्वतःच पर्सनल असं इन्स्टा अकाउंट देखील आहे आणि तिला तिकडे लाखो लोक फॉलो देखील करतात! सितारा महेश बाबूच्या ‘सरकारू वारी पाटा’ या सिनेमातील एका गाण्यात दिसली होती आणि त्यानंतर पेनी या गाण्यात देखील सितारा अतिशय सुंदर डान्स करताना दिसली होती.

मीडिया वरून मिळालेल्या माहितीनुसार डान्स इंडिया डान्स तेलगूच्या या कार्यक्रमामध्ये येण्यासाठी महेश बाबुने झी तेलगू सोबत ९ कोटींची डील फायनल केली आहे. याचमुळे तो यावेळी त्याच्या मुलीला सुद्धा सोबत घेऊन आला आणि पहिल्यांदाच महेश बाबू आणि सितारा यांनी स्टेट देखील शेअर केलेला आहे.

Leave a Comment

Close Visit uttamsheti