महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता अडकणार लग्नबंधनात .. नवरा देखील आहे हास्यजत्रेचा भाग..

छोट्या पडद्यावरील सर्वाँना खळखळून हसवणारा शो म्हणजे सोनी मराठी चॅनल वरील महाराष्ट्राची हास्यजत्रा.. हा शोमधील हास्य वीर नेहमीच चर्चेत येत असतात. सध्या या शो मधील सर्वांची लाडकी वनी.. तिने आजवर तिच्या विनोदबुद्धीने सर्वांचे मनोरंजन केले आहे. सोबतच तिने कबीर सिंह या हिंदी सिनेमात साकारलेली भूमिका चांगलीच गाजली होती. ज्यानं तिच्या अभिनय क्षेत्रात मोठा ब्रेक मिळाला.

वनिता तिच्या बोल्ड फोटोशूट असो किंवा हास्यजत्रेतील दर्जेदार कॉमेडी यामुळे नेट कऱ्यांच्या चर्चेचा भाग नंत असते. पण यावेळी ती कोणत्या फोटोशूटमुळे नव्हे तर तिच्या लग्नामुळे चर्चे आली आहे.वनिता सुमित लोंढेबरोबर लग्न करतेय. काही महिन्यांपूर्वी वनितानं सुमितच्या वाढदिवसाची पोस्ट शेअर करत गुड न्यूज चाहत्यांनी दिली होती.आणि एक विशेष बाब म्हणजे वनिताचा होणार नवरा हा देखील महाराष्ट्राची हास्यजत्रेचा एक भाग आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vanita Kharat (@vanitakharat19)

वनिताचा होणारा नवरा सुमित लोंढे हा उत्तम फोटोग्राफर आहे. त्याचप्रमाणे तो उत्तर व्हिडीओ क्रिएटर देखील आहे.व्हिडीओ क्रिएटिंगबरोबरच सुमित ब्लॉगही बनवतो.दोघे अनेक वर्ष एकमेकांना डेट करत आहेत.

इतकंच नाही तर महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील स्किटमध्ये देखील तिच्या लग्नाची चर्चा रंगली होती. आता लवकरच वनिता आणि सुमितचं लग्न होणार आहे. वनिताची घरी लगीन घाई सुरू झाली असून अलिकडेच तिनं त्यांच्या लग्नाची तारीखही सांगितली आहे. वनिता आणि सुमित २ फेब्रुवारी २०२३ ला लग्न करणार आहेत. वनिता आणि सुमितचं लग्न नेमकं कुठं होणार आहे, लग्नाला ती कोणाला निमंत्रित करणार आहे याबद्दल तिनं काहीही सांगितलेलं नाही. लवकरच लग्नाबद्दलची माहिती वनिता सांगणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vanita Kharat (@vanitakharat19)

वनिताचा बॉयफ्रेंड सुमित लोंढे हा एक व्हिडिओ क्रिएटर आणि ब्लॉगर आहे. त्याला फिरण्याचीही प्रचंड हौस आहे. सुमितनं याआधी वनिताच्या वाढदिवसानिमित्तही एक खास पोस्ट शेअर केली होती. तसेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील अनेक मंडळी सुमितला ओळखतात. त्यांच्यासह अनेक फोटोही त्याने शेअर केले आहेत. वनिताच्या कामाबद्दल सांगायचं तर ती सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात काम करत आहे. लवकरच ती पोस्ट ऑफिस उघडं आहे या मालिकेत वनिता दिसणार आहे.

यासोबतच वनिता आता नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. “सरला एक कोटी’ असं या वनिताच्या आगामी चित्रपटाचं नाव आहे. चित्रपटाचे पोस्टर शेअर करत तिने एक कॅप्शन देखील लिहलं आहे. ” डाव लागलाय मोठा काही लागणा मेळ… येडं झालंय गाव सारं सुरू झालाय खेळ… भाबड्या लोकांची डांबरट गोष्ट… ‘सरला एक कोटी’ असं तिने म्हंटलं आहे.

Leave a Comment

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप