छोटया पडद्यावरील या ग्लॅमरस खलनायिकेच्या नवऱ्याला पाहिलंत का? आहे मोठा उद्योजक..

0

स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असत मालिकेत हॉट खलयानिका म्हणून प्रसिद्ध असलेली माधवी निमकर ही एक उत्तम अभिनेत्री आहे. तिला व्यायामाची खूप आवड आहे. त्यामुळे ती स्वतःला फिट ठेवत असते. तसेच फिटनेस टिप्स प्रेक्षकांना देत असते. सोशल मीडिया न्यूज चॅनल वर ती योग गुरू म्हणून ओळखली जाते. पण तुम्हाला तिच्या काही खास गोष्टी माहीत आहेत का? ज्या ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल.

अभिनेत्री माधवी निमकर हिची मावस बहीण म्हणजेच प्रसिद्ध अभिनेत्री “सोनाली खरे” हिच्यामुळे ती अभिनय क्षेत्रात आली. घडलं असं कि सोनालीच शूटिंग असताना तिच्यासोबत माधवी देखील शूटिंगला जायची.खोपोलित आपले संपुर्ण शिक्षण झालेली माधवी आपल्या बहिणीसोबत मुंबईला चित्रीकरणाच्या सेटवर जायची. यातूनच तिच्यात अभिनयाची गोडी निर्माण झाली. २००९ साली ‘बायकोच्या नकळत’ या चित्रपटातून माधवीचे कलाक्षेत्रात आगमन झाले. दुसऱ्या वर्षी असा मी तसा मी या चित्रपटात ती झळकली. त्यानंतर नवरा माझा भवरा, सगळं करून भागलं, धावा धाव, संघर्ष अशा चित्रपटातून ती विविधांगी भूमिकेत झळकली.

तरीही सांगण्यात येते की, माधवीने आपल्या करिअरची सुरुवात सूत्रसंचालिका म्हणून केली होती. मनोरंजन क्षेत्रात तिने काम करता करता एका ठिकाणी नोकरीही केली. परंतु शेवटी तिने मनोरंजन क्षेत्रात काम करण्याचे नक्की केले. 2007 साली गाणे तुमचे आमचे या कार्यक्रमासाठी तिला निवेदिका म्हणून बोलावण्यात आलं होते. तिथून तिने अभिनय प्रवासाला सुरुवात केली.

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका स्वप्नांच्या पलीकडले या मालिकेत तिने आपलं अभिनय कसाब दाखवत खलनायिका म्हणून लोकप्रियता मिळवली. जी आजही टिकून आहे. तिच्यासारखी सुंदर खलनायिका पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.त्यानंतर अवघाची हा संसार, जावई विकत घेणे आहे ,हम तो तेरे आशिक है या मालिकांमधूनही तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.मालिकांप्रमाणेच माधवी निमकर हिने संघर्ष, नवरा माझा भवरा, सगळं करून भागले, धावाधाव काही चित्रपटांमध्ये काम केले. त्यासोबतच अनेक नाटकांमध्ये तिने काम केलं. महारथी हे त्यांचे गाजलेले नाटक आहे.

२०१० साली तिचा विवाह विक्रांत कुलकर्णी याच्याशी झाला असून त्यांना एक मुलगा देखील आहे.माधवी निमकर हिच्या मुलाचे नाव रुबेन असे आहे, तर माधवी हिचा पती हा खूप मोठा व्यावसायिक असून तो पर्यटन क्षेत्राशी संबंधित काम करत असल्याचे सांगण्यात येते. ते दोघेही एकमेकांना साथ देत अगदी गुण्यागोविंदाने संसार करतात.

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप