छोटया पडद्यावरील या लोकप्रिय खलनायिकेला ओळखलंत का? ‘सुख म्हणजे नक्की..’ मध्ये साकारतीये महत्त्वपूर्ण भूमिका..

0

सोशल मीडियावर नेहमीच कलाकारांचे जुने फोटोज् व्हायरल होत असतात. आणि आपल्या चाहत्यांसोबत जोडले जाण्यासाठी अनेक कलाकार सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात.

दरम्यान, सोशल मीडियावर एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या कॉलेजजीवनातील फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ही अभिनेत्री तिच्या दोन मैत्रिणींसोबत दिसून येत आहे. विशेष म्हणजे या फोटोत दिसणारी तरुणी एक लोकप्रिय असण्यावर कोणाचाही विश्वास नाही. विशेष म्हणजे सध्या ही अभिनेत्री सुख म्हणजे नक्की काय असतं या गाजलेल्या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.

दरम्यान, व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये दिसणारी अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून माधवी निमकर आहे.माधवीचं प्रत्येक फोटोशूट, ग्लॅमरस अंदाज, हटके स्टाईल ही प्रेक्षकांना नेहमीच भावताना दिसते.

 

View this post on Instagram

 

A post shared by maadhavi nemkar shalini 🥰🌸 (@maadhavinemkarofficial)

माधवी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणून माधवीला ओळखलं जातं.

सध्या माधवी सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत शालिनी वहिनी ही खलनायिकेची भूमिका साकारत आहे. माधवी निमकर अनेक वर्ष चित्रपटसृष्टीत काम करतेय. मराठीबरोबरच हिंदी मालिकांमध्येही तिनं काम केलं आहेमाधवीने आतापर्यंत अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये काम केलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by maadhavi nemkar shalini 🥰🌸 (@maadhavinemkarofficial)

यातही तिने ‘अवघाची संसार’, ‘जावई विकत घेणे’, ‘स्वप्नांच्या पलीकडे’ या मालिकांमध्ये काम केलं. तर ‘संघर्ष’, ‘नवरा माझा भवरा’, ‘सगळं करून भागलं’, ‘धावाधाव’, ‘बायकोच्या नकळत’ या सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे.

दरम्यान, माधवीने ती साकारत असलेल्या पात्राबद्दल विचारले असता अशी प्रतिक्रिया दिली की, ‘शालिनी’ हे पात्र साकारताना मला आधी फार भीती वाटत होती. कारण ही बोलीभाषा वेगळी आहे. त्यामुळे ती मला जमणार की नाही अशी शंका होती. पण संपूर्ण टीमच्या सहकार्यामुळे मी या पात्राला न्याय देऊ शकले. मला वाटतं बदलत्या काळानुसार आपणही बदललं पाहिजे. त्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. त्यातून आनंद तर मिळतोच आणि प्रेक्षकांनाही हा बदल आवडतो. मी एकदा एका कार्यक्रमाला गेले होते तेव्हा तिथल्या दोन बायकांनी मला पाठीत बुक्के मारले होते. कारण मी मालिकेत नायिकेला खूप त्रास देते असं त्यांना वाटत होतं. आता सोशल मीडिया प्रचंड प्रभावी आहे, प्रेक्षकही जाणकार आहेत. वेळोवेळी त्यांच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचत असतात. त्यामुळे नवनवीन काम करण्याची ऊर्जा मिळते.

ती छोट्या पडद्यावरील खलनायिका म्हणून ओळखली जाते. ती उत्कृष्ट अभिनेत्री असण्यासोबतच फिटनेस फ्रिक देखील आहे. तिला व्यायाम आणि योगा करणे पसंत आहे. त्यामुळे तिच्या सुंदरतेमध्ये अजून भर पडते.

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप