कलर्स मराठी वाहिनीवरील लेक माझी दुर्गा मालिकेतील या अभिनेत्याने उडवला लग्नाचा बार…

कलर्स मराठीवरील ‘लेक माझी दुर्गा’ या मालिकेचे सर्व कथानक दुर्गाभोवती फिरताना दिसणार आहे. ही मालिका हिंदी मालिके शक्तीचा रिमेक असल्याची चर्चा आहे. स्वत:च्या अस्तित्वासाठी लढणारी दुर्गा बाबांना आपलेसे करणार का? असा विचार करणारी ही दुर्गा मध्यवर्ती भूमिकेत पाहायला मिळाली. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने चाहत्यांना आपलेसे करत मनात पक्के स्थान निर्माण केले.

दरम्यान, या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरीही मालिकेतील कलाकारांविषयी जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. दरम्यान, या मालिकेतील अभिनेत्याने खुशखबर दिली आहे.

मालिकेतील नायक जयसिंगचा मित्र फुकट म्हणजेच फुलचंदची भूमिका अभिनेता विश्वजित पालव याने साकारली होती. आपल्यालाही फुकट सारखा एक मित्र असावा असे त्याच्या भूमिकेकडे पाहून सगळ्यांना वाटत होते. विश्वजित पालवने ही भूमिका त्याच्या सहजसुंदर अभिनयातून सुरेख वठवली, त्यामुळेच तो आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.

विश्वजित पालव हा नुकताच विवाहबद्ध झाला आहे, त्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दोन दिवसांपूर्वी विश्वजित आणि सानिका नाईक यांचा विवाहसोहळा मोठ्या थाटात पार पडला. या लग्नाला मराठी सृष्टीतील कलाकारांनी देखील हजेरी लावली होती. तर सेलिब्रिटींनीही त्याने शेयर केलेल्या फोटोवर कमेंट करत अभिनंदनाचा वर्षाव देखील केला आहे.

काही दिवसांपूर्वी विश्वजितने आपल्या प्रिवेडिंगचे फोटो शेअर केले होते, तेव्हा तो लवकरच लग्न करणार असल्याचे जाहीर झाले होते. विश्वजितने स्वतःच्या बळावर मराठी सृष्टीत ओळख बनवली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळच्या विश्वजितने कॉलेजमध्ये असल्यापासूनच नाटकातून काम करण्यास सुरुवात केली. नाटक, एकांकिका करत त्याने विविध पारितोषिकं पटकावली.

त्याच्या मालवणी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्याला झी मराठीच्या गाव गाता गजाली या लोकप्रिय मालिकेत उत्कृष्ट भूमिका साकारून लोकप्रियता संपादित केली. या मालिकेत त्याने प्रसादची दमदार भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे विश्वजित प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला.

दरम्यान, नुकत्याच आलेल्या प्रेम प्रथा धुमशान या चित्रपटात तो एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसला. वस्त्रहरण, प्रितम, काळी माती, कॉमेडी बीमेडी, देवाक काळजी, धुमशान, लेक माझी दुर्गा अशा दर्जेदार मालिका, नाटक आणि चित्रपटातून त्याच्या भूमिकेला वाव मिळत गेला. वस्त्रहरण या नाटकातून विश्वजित वेगवेगळ्या भूमिकेत पाहायला मिळाला. शबय या त्याच्या लघुपटाला राष्ट्रीय महोत्सवात द्वितीय क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. कॉलेजमध्ये असताना अभिनयासोबतच विश्वजितने दिग्दर्शनाचे तंत्रज्ञान शिकून घेतले होते.

 

Leave a Comment

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप