छोट्या पडद्यावरील काही मालिका आणि त्यातील भूमिका कायम प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. त्यातीलच एक नाव म्हणजे ‘लागीर झालं जी’ ही मालिका. या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शिवानी बावकर या मालिकेत शितल पवार ही भूमिका साकारुन शिवानीने तुफान लोकप्रियता मिळवली. त्यामुळे आज छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. शिवानी सोशल मीडियावर नेहमी ॲक्टीव्ह असते. बऱ्याच काळात ती छोट्या पडद्यावर दिसली नव्हती पण लवकरच ती एका नव्या मालि केच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दरम्यान,सोशल मीडियावर तिनं आपल्या नव्या मालिकाचा प्रोमो शेअर केला आहे. यातील रांगडा फौजी आणि बेधडक प्रेम करणारी मुलगी यांची प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या मनाला भावली होती. आज्या आणि शीतली ही मुख्य पात्रे प्रचंड गाजली होती आणि आजही चाहत्यांच्या मनात घर करून आहेत. मालिकेतील शीतलीचा ‘लाखात एक माझा फौजी’ हा डायलॉग तर तरुण पिढीला वेडवणारा ठरला होता. आता शिवानी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन जिंकायला छोट्या पडद्यावर येत आहे.
शिवानी तिच्या नव्या कोर्या मालिकेसह झी मराठी वाहिनीवरवरील ‘लवंगी मिरची’ या मालिकेतून कमबॅक करणार आहे . नुकताच या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आहे. यात शिवानी तिच्या साध्या भोळ्या बहिणीला छेडणाऱ्या दोन गावगुंडांना धडा शिकवत असतना दिसत आहे. तिचा तिखट अंदाज या मालिकेतून दिसणार आहे. नव्या मालिकेचा प्रोमो शेअर करत वाहिनीने लिहिलं, ‘लवंगी मिरचीच्या वाकड्यात गेलं तर झटका लागल्याशिवाय राहणार नाही.’ या प्रोमोला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
या नव्या मालिकेतील शिवानीच्या पात्राचे नाव अजून समोर आलं नसलं तरी प्रोमोवरून तिची ही भूमिका शीतली सारखीच बिनधास्त आणि ठसकेबाज अशी दिसत आहे. शिवानीने ‘लागिरं झालं जी’ नंतर काही मालिका आणि चित्रपटातून काम केलं पण भाग्याने तिला साथ दिली नाही. त्यामुळे आता तिला पुन्हा त्याच ठसकेबाज, दमदार भूमिकेत पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. झी मराठीवरील ‘लवंगी मिरची’ ही मालिका १३ फेब्रुवारीपासून दुपारी १ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
View this post on Instagram
दरम्यान,मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर झी मराठी वाहिनीने दोन नव्या मालिकांची घोषणा केली आहे. त्यात ‘यशोदा’ आणि लवंगी मिरची’ या मालिकांचा समावेश आहे. लवंगी मिरची मालिकेत शिवानी बावकर मुख्य भूमिकेत आहे. तर दुसरी ‘यशोदा’ हा मालिका साने गुरुंजीच्या जीवनावर आधारित असणार आहे. शिवानी ला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक असल्याचे चित्र सोशल मीडियावर दिसत आहे.