एक्स बॉयफ्रेंड आला आड… ललित मोदी आणि सुश्मिता सेन यांचं झालं महिन्याभरातच ब्रेक अप
सोशल मीडिया म्हणजे रोज नव्या चर्चांना वाट देणारं प्लॅटफॉर्म. यावर अनेक कलाकारांच्याव्यक्तिगत आयुष्यात चाहत्यांना रस असतो. त्यांच्या आयुष्यात काहीही घडो त्यात ते स्वतः लक्ष घालत अनेक चर्चा करतात. काही लोक कलाकारांना ट्रोल देखील करतात. गेल्या काही काळात आपल्या रिलेशन शिप मुळे भरपूर प्रमाणात ट्रोल झालेली अभिनेत्री सुश्मिता सेन पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या चर्चेचा भाग बनली आहे.
सर्वांना माहीतच आहे की गेल्या काळात आयपीएलचे माजी अध्यक्ष आणि त्यानंतर फरार झालेले ललित मोदी यांनी माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन यांच्या रिलेशनशिपच्या चर्चेमुळे एकच खळबळ उडाली होती.
पण आता रिलेशनशिपच्या चर्चा समोर आल्याच्या एका महिन्यातच दोघांचं ब्रेक अप झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आणि या दोघांच्या वेगळं होण्याचं कारण सुष्मिताचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल असल्याचं म्हटलं जात आहे. पण कसा कट रोहमन यांच्या ब्रेक उप च कारण बनला..
नुकतच ललित मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर प्रोफाइलवरुन सुश्मिता सेनचं नाव काढून टाकल्याचे निदर्शनास आले आहे. यावरुन दोघांचा ब्रेकअप झाल्याचा चर्चा वाढल्या आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर पुन्हा एकदा या दोघांना ट्रोल करण्यात येत आहे. दोघांच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर बदल झाल्याचं दिसून आलं आहे. दोघांचे प्रोफाइल फोटो देखील बदलण्यात आले आहेत. सुष्मिता आणि ललित मोदी यांनी त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांवर अजून कोणतेही अधिकृत भाष्य केलेलं माही. आणि अद्याप याबाबत दोघांनी कोणती पोस्टही केलेली नाही.
जवळपास एक महिनाआधी ललित मोदी यांनी त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर दोघांचे फोटो शेअर करत त्यांच्या नात्याची घोषणा करून आपला आनंद व्यक्त केला होता. पण आता मोदींनी त्यांच्या प्रोफाइल आणि इन्स्टाग्राम बायोमधून सुष्मिताचा फोटो आणि नाव काढून टाकलं आहे. नवीन प्रोफाइलमध्ये ललित मोदी हसताना दिसत आहेत. तर त्यांच्यामागे आयपीएलचं बॅकग्राऊंड दिसत आहे. तर इन्स्टाग्राम बायोमध्येही केवळ आयपीएल फाऊंडर असं दिसत आहे. माय लव्ह सुष्मिता हे काढून टाकल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.
ललित मोदींनी त्यांच्या प्रोफाइलमध्ये केलेल्या या बदलांनंतर दोघांचं ब्रेकअप झाल की काय असा प्रश्न उद्भवला आहे. ब्रेकअपच्या चर्चांनंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तर दुसरीकडे सुष्मिताच्या एक्स बॉयफ्रेंडची ही चर्चा रंगली आहे. दोघांच्या ब्रेअअपचं कारण तिचा बॉयफ्रेंड असल्याचं म्हटलं जात आहे.