प्रतीक्षा संपली, क्रिश ४ येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, या तारखेला..
सुपरहिरो, हा एक असा शब्द अख्ख्या बालकवर्गला नाही तर प्रत्येक वयोगटातील लोकांना वेड लावले आहे. पण असे सुपरहिरो केवळ हॉलिवूडमध्ये पहायला मिळत होते. पण भारताला आपला सुपरहिरो मिळाला तो क्रिशच्या रुपात.. या मेड इन इंडिया हिरोने सर्वांना अक्षरशः डोक्यावर घेतले. क्रिश सिनेमाचे ३ भाग प्रदर्शित झाले जे तितकेच सुपरहिट ठरले. या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. पण चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे आता लवकरच क्रिश चित्रपटाचा चौथा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
क्रिश साकारणाऱ्या हृतिक रोशनने गेल्या वर्षी जूनमध्ये राकेश रोशनच्या ‘क्रिश ४” ची अधिकृत घोषणा केली होती. तेव्हापासून या बहुप्रतीक्षित चित्रपटाची चर्चा सुरु होती. पण आता प्रेक्षकांची प्रतीक्षा लवकरच संपणार असं दिसतंय.
क्रिश ४ या चित्रपटावर काम सुरु झालं असून तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.हृतिकही त्याच्या सुपरहिट फ्रँचायझी चित्रपट ‘क्रिश’च्या पुढील भागासाठी खूप प्रसिद्धी मिळवत आहे. गेल्या वर्षी या चित्रपटाच्या घोषणेपासून तो सतत चर्चेत आहे. ‘क्रिश ४’ बद्दल एक मोठे अपडेट समोर येत आहे, जे ऐकल्यानंतर त्याच्या चाहत्यांना खूप आनंद होईल.
View this post on Instagram
रिपोर्टनुसार, क्रिश ४ ची कथा तिथून सुरू होईल जिथे क्रिश ३ चित्रपटाची कथा संपली होती. क्रिश ४ या चित्रपटाची कथा मागचे संदर्भ घेऊनच पुढे सुरु होईल, परंतु नवीन पात्रे आणि रोमांचक ट्विस्टसह हा चित्रपट पूर्णपणे वेगळा असेल. राकेश रोशन या चित्रपटाच्या कथेवर काम करत आहेत. हा सिनेमा अतिशय बिग बजेट असेल यात कोणतीच शंका नाही.
या चित्रपटामध्ये असे काही अॅक्शन सीक्वेन्स दाखवण्यात येणार आहेत, जे यापूर्वी कधीही पाहिले गेले नाहीत. दरम्यान प्रसिद्ध दिग्दर्शक राजेश रोशन यांनी क्रिश ४ च्या संगीताबद्दल एका मुलाखतीत सांगितले हते कि, “आम्ही अद्याप क्रिश 4 च्या संगीतावर काम सुरू केलेले नाही, परंतु अंतिम स्क्रिप्ट पूर्ण होताच आम्ही त्याला सुरुवात करू.”तसेच त्यांनी स्पष्ट केले होते कि क्रिश ४ या चित्रपटात ह्रितिक किमान एक गाणे स्वतःच्या आवाजात गाणार आहे.
दरम्यान, हृतिक रोशन येणाऱ्या काळात विक्रम वेधा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती त्याने सोशल मीडियावर दिली होती. आता ह्रितिकला पुन्हा क्रिश म्हणून पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक झालेत.
बॉलिवूडचा हँडसम हंक हृतिक रोशन आजकाल त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनासाठी चर्चेत आहे. अभिनेता त्याच्या वैयक्तिक आयुष्यात नवीन सुरुवात करत असताना, तो त्याच्या कामाच्या आघाडीवर देखील लक्ष केंद्रित करत आहे. एकीकडे तो त्याच्या ‘विक्रम वेधा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे, तर दुसरीकडे