सोशल मीडियावर सध्या जिकडे पहावे तिकडे सर्वाधिक चर्चेत असणारे नवविवाहित जोडपे अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांची चर्चा रंगली आहे. या दोघांनी आज खंडाळ्यातील त्यांच्या घरी विवाहबद्ध होत एकमेकांशी नाते जोडले. यावेळीचे त्यांचे फोटोज सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
या फोटोंमध्ये अथिया फिकट गुलाबी रंगाच्या लेहंग्यामध्ये अतिशय सुंदर दिसत होती तर के एल राहुल पांढऱ्या रंगाच्या शेरवानी मध्ये खूपच रुबाबदार दिसत होता. त्यांचा मंडपात बसलेला आणि त्यानंतर फेरे घेत असतानाचे फोटोज् देखील समोर आले आहेत. यापैकी एक मनमोहक फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे ज्यामध्ये केएल राहुल अथियाच्या हाताचे चुंबन घेताना दिसत आहे. दरम्यान, शेवटचा त्यांचा क्लोज-अप आहे. लग्नाच्या फोटोंसाठी कॅप्शन देत के एल राहुल म्हणाला: “तुझ्या सानिध्यात, मी प्रेम कसे करावे हे शिकतो.”
Wedding pictures of KL Rahul and Athiya Shetty.
A very happy married life to them! pic.twitter.com/uxTodac1nU
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 23, 2023
त्यानंतर त्यांच्या लग्नाच्या पोस्टमध्ये अथिया शेट्टी आणि केएल राहुलने लिहिले: “आज, आमच्या सर्वात प्रिय व्यक्तींसोबत, आम्ही अशा घरात लग्न केले ज्याने आम्हाला खूप आनंद आणि शांतता दिली आहे. कृतज्ञता आणि प्रेमाने भरलेल्या अंतःकरणाने आम्ही यासाठी तुमचे आशीर्वाद घेत आहोत. एकतेचा प्रवास.”
अथिया शेट्टी आणि केएल राहुलने अगदी सिक्रेट पद्धतीने लग्न केले. सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील त्यांच्या घरी अत्यंत खाजगी समारंभ आयोजित करण्यात आला ज्यामधे त्यांचे काही खास पाहुणे आणि अगदी जवळच्या कुटुंब आणि मित्रपरिवार उपस्थित राहिला. यावेळी कृष्णा श्रॉफ, डायना पेंटी, अनुष्का रंजन आणि पती आदित्य सील आणि अंशुला कपूर यांनी हजेरी लावली सोबतच क्रिकेटपटू इशांत शर्मा, पत्नी प्रतिमा आणि वरुण आरोन यांनीही हजेरी लावली.
लग्नानंतर अभिनेता आणि नुकतेच सासरे बनलेले सुनील शेट्टी यांनी कार्यक्रमस्थळाच्या बाहेर उभ्या असलेल्या मीडियाला फेरे संपल्याची पुष्टी केली. “मी आता सासरा झालो आहे,” पुढे ते म्हणाले, आयपीएल सिझननंतर रिसेप्शन आयोजित केले जाईल. सुनील शेट्टी आणि मुलगा अहान यांनी मीडियाला मिठाई वाटून लग्नाचा आनंद साजरा केला.
अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांनी २०१९ मध्ये डेटिंग करण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, वेळोवेळी त्यांचे फोटोज् आणि गॉसिप सोशल मीडियावर व्हायरल होत होते. आणि आता ते लग्नबद्ध झाल्यामुळे त्यांचे चाहते देखील खूप आनंदी आहेत. लाइक्स आणि कॉमेंट्सच्या माध्यमातून चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.