चक्क ६५ व्या वर्षी आमिर खान चढणार का बोहल्यावर? सोशल मीडियावर फोटोज् झाले व्हायरल…

बॉलीवूडमध्ये काही जोड्यानी आजवर अनेकांसमोर आदर्श प्रस्थापित केले आहेत. ही यादी बरीच मोठी आहे. यादीत, किरण राव आणि आमिर खानचं देखील नाव होतं. बॉलीवूडचा परफेक्शनिस्ट म्हणून आमिरला ओळखलं जात. पण आमिर खान वारंवार आपल्या वैयक्तीक आयुष्यामुळे, कायमच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला बघायला मिळतो. नुकतीच एक चर्चा आता सोशल मीडियावर गाजत आहे ती म्हणजे आमिर खानच्या लग्नाची.

या चर्चेत सरळ सरळ आमिरने कियाराशी लग्नगाठ बांधली असल्याचं म्हटलं जात आहे. खरंतर याचा एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये कियारा अडवाणी आणि आमिर खान लग्नाच्या कपड्यात दिसून येत आहेत. पण या व्हायरल फोटो मागे एक वेगळच सत्य लपले आहे.

काही काळापूर्वी बॉलीवूड कलाकार कियारा अडवाणी आणि आमिर खान मुंबईच्या रस्त्यावर स्पॉट झाले होते. यावेळी दोघंही नवरा नवरीच्या गेटअपमध्ये दिसून आले. कियार अडवाणी वधूच्या लेहेंग्यात अतिशय सुंदर दिसत होती. तर दुसरीकडे आमिर खानही पांढऱ्या कुर्ता पायजमामध्ये खूपच हँडसम दिसत होता.

समोर या आलेल्या फोटोनंतर सोशल मीडियावर अनेक तर्कवितर्क लावले जात होते. आमिर खान आणि कियारा अडवाणी एकमेकांशी लग्न करणार आहेत की काय, अशीही अनेकांनी चर्चा केली. असा अंदाज अनेकांनी सोशल मीडियावर लावला. मात्र ही एक अफवा आहे. या दोघांचा व्हायरल होणारा हा फोटो एका जाहिरातीच्या शुटिंग दरम्यानचा आहे.

आमिर खान आणि कियारा अडवाणी अलीकडेच एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी मुंबईतील सेटवर गेले होते. जिथे मीडियाने त्यांना कॅमेऱ्यात कैद केलं. यादरम्यानचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये कियारा अडवाणी हेवी पिंक कलरच्या लेहेंग्यामध्ये ती अतिशय सुंदर आणि सालस दिसत आहे.

अभिनेता आमिर खानही वराच्या लूकमध्ये दिसत आहे. कियारा आणि आमिरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर कियारा शेरशाह या चित्रपटामुळे चर्चेत राहिली आहे. त्याचवेळी आमिर खानने त्याच्या लाल सिंह चड्ढा या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. दरम्यान कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा ने त्यांच्या नात्याची पुष्टी केल्यामुळे त्यांच्या लग्नाच्या बातम्यांनी ही सोशल मीडियावर जोर धरला आहे. शेरशाह सिनेमानंतर या दोघांमध्ये जवळीक वाढल्याचे ही म्हंटले जाते. त्यामुळे आता लवकरच त्यांचा विवाह सोहळा चाहत्यांना अनुभवता येणार आहे.

Leave a Comment

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप