‘काय होतीस तू काय झालीस तू…’ आमिर खानसोबत घटस्फोटानंतर किरण रावची झाली अशी अवस्था

0

बॉलीवुडमधील जोड्या नेहमीच चाहत्यांना आकर्षित करत असतात. त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. दरम्यान, बॉलीवुड मध्ये आयडीयल कपल म्हणून अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांच्याकडे पाहिले जायचे.. पण त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीने सर्वांना हादरवून सोडले होते. घटस्फोटानंतर बऱ्याच वेळा ते सोबत दिसून आले. पुन्हा एकदा त्यांचं भेटण नेट कऱ्यांच्या चर्चेचा विषय बनले आहे.

घटस्फोटानंतर आमिर खान आणि किरण राव एकत्र दिसण्याची ही पहिली वेळ नाही. दोघेही अनेकदा त्यांचा मुलगा आझादसोबत दिसतात. ते दोघे मिळून त्यांच्या मुलाचे पालकत्व करत आहेत. याआधी दोघेही घटस्फोटाच्या आदल्या दिवशी मुलासोबत स्पॉट झाले होते. आणि आता आमिर आणि किरण जेवण करण्यासाठी एका रेस्टॉरंटमध्ये पोहोचले होते. तेव्हाचे त्यांचे फोटोज् क्लिक करण्यात आले. आता हे सगळे फोटो सोशल मीडियावर येताच लोकांनी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली.

आमिर खान आणि किरण राव यांच्या फोटोमध्ये किरणच्या लूकबद्दल लोकांनी ट्रोल केले. किरणने सैल शर्ट आणि पँट घातली आहे. त्याच वेळी, तिचे केस पूर्णपणे पांढरे झालेले दिसतात. अशा परिस्थितीत लोक तिच्या प्रकृतीवर भाष्य करत आहेत. एक व्यक्ती म्हणाली की, ” काय झाले आहे, नेमकं ? ” त्याचवेळी दुसऱ्याने लिहिले की घटस्फोटानंतर ती आता म्हातारी झाली आहे.

त्याचबरोबर अनेक लोकांनी दोघांच्या नात्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एका युजरने असे लिहिले आहे की त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते, पण मग घटस्फो’ट झालाच का ? त्याचवेळी, एकाने विचारले की घटस्फो’टानंतरही ते एकत्र का आहेत? किरणला या अवस्थेत पाहून अनेकांना ओळखताही आले नाही.

अजूनही दोघे एकत्र काम करत आहेत… आमिर खान आणि किरण राव पूर्वीप्रमाणेच अनेक प्रकल्पांवर एकत्र काम करत आहेत. दोघेही लडाखमध्ये सुद्धा एकत्र दिसले होते. दोघांचा डान्स व्हिडिओही व्हायरल झाला होता. गेल्या महिन्यात दोघेही ‘लाल सिंह चड्ढा’च्या शूटिंगनंतर लडाखहून परतले. एक व्हिडीओ शेअर करून दोघांनी सांगितले की ते व्यावसायिकपणे एकत्र काम करतील. तसेच, मुलाचे सह-पालकत्व करतील. दोघेही म्हणतात की शेवट म्हणून पाहण्याऐवजी आम्ही याला एक नवीन सुरुवात म्हणून पाहत आहोत. ठी

आमिर खान आणि किरण राव यांनी घटस्फोटानंतर त्यांच्या संयुक्त निवेदनात म्हटले होते, या १५ सुंदर वर्षांमध्ये आम्ही एकत्र आयुष्यभर अनुभव, आनंद आणि हास्य या सर्वांचा अनुभव घेतलेला आहे. आमचे नाते हे विश्वास, आदर आणि प्रेमाने भरलेले राहिले. आता आम्ही आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू करणार आहोत.

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप