“जेव्हा मी लग्न करेन तेव्हा आलिया…” ,सिद्धार्थ मल्होत्राच्या एक्स गर्लफ्रेंड बद्दल कियारा बोलली असं..

0

सोशल मीडियावर अनेक कलाकार जोडप्यांच्या चर्चा नेट कऱ्यांमध्ये रंगत असते. काही कपल्स नेट कऱ्यांच्या रडारवरच असतात. त्यांच्या यादीमध्ये आता शेरशाह फेम जोडी कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचं नाव समाविष्ट झाले आहे. दरम्यान, करण जोहरच्या चॅट शो मध्ये त्यांच्या नात्यावर मोहोर उमटवण्यात आली. सिद्धार्थ मल्होत्रा आपल्यासाठी बेस्ट फ्रेंडपेक्षा जास्त काहीतरी आहे अशी कबुली कियाराने या शोमध्ये दिली..त्यामुळे त्यांचे चाहते भलतेच खुश झाले आहेत.

दरम्यान, करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण ७’मध्ये शाहिद कपूरने कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची जोडी हटके असल्याचं म्हणत तिची टर उडवत आहेत. तिची मस्करी करत असताना तो म्हणाला, “मी हाच विचार करत आहे की, यांची मुलं किती सुंदर असतील.” गप्पांदरम्यान करन जोहर आणि शाहीद कियाराची चांगलीच टांग खीचाई करताना आढळले.

या खास भागात करण जोहरला सिद्धार्थ-कियारा यांच्या लग्नाबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर खुलासा करताना ती म्हणाली, “सिद्धार्थ हा माझा सर्वात जवळचा मित्र आहे.” यानंतर तिला लग्नाबद्दलचा प्रश्न विचारताच ती म्हणाली, “माझा लग्नावर पूर्ण विश्वास आहे. मी माझ्या आजूबाजूला अनेक छान छान विवाहसोहळे पाहिले आहेत. त्यामुळे मलाही माझ्या आयुष्यात ते घडताना पाहायचे आहे. पण हे कधी होईल हे मला सांगता येणार नाही. पण जेव्हा लग्न होईल तेव्हा मी सर्वांना नक्कीच बोलवणार आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

पुढे रॅपिड फायर राउंडमध्ये करण जोहरने कियाराला प्रश्न केला की, ‘तुझ्या लग्नाच्या वेळी ब्राइड स्क्वॉडमध्ये कोणती अभिनेत्री असायला हवी असं वाटतं?’ यावर उत्तर देताना कियाराने अभिनेत्री आलिया भट्टचं नाव घेतलं. ती म्हणाली, “मला आलिया खूप आवडते आणि मला वाटतं की ती माझ्या ब्राइड क्वॉडमध्ये असायला हवं. ती खूप क्यूट आहे आणि मला ती खूप आवडते.” आलिया भट्ट ही सिद्धार्थ मल्होत्राची एक्स गर्लफ्रेंड आहे.त्यांच्या चर्चाही सोशल मीडियावर रंगल्या होत्या.

याचवेळी करण जोहरने सिद्धार्थ आणि कियाराच्या पहिल्या भेटीबाबत खुलासा केला.कियारा आणि सिद्धार्थ यांनी ‘शेरशाह’ चित्रपटात एकत्र काम केलं आहे. पण या चित्रपटात काम करण्याआधीपासून हे दोघं एकमेकांना ओळखत होते. या दोघांची पहिली भेट करण जोहरच्या एका पार्टीमध्ये झाली होती. ‘कॉफी विथ करण’मध्ये या भेटीबद्दल स्वतः करण जोहरनेच सांगितलं आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी ‘लस्ट स्टोरीज’च्या रॅप पार्टीमध्ये पहिल्यांदा भेटले होते. त्यावेळी करण जोहरही त्यांच्यासोबत होता.

Leave A Reply

Your email address will not be published.