वॉयलंस वॉयलंस म्हणत अख्ख्या देशाला वेड लावणाऱ्या रॉकी भाईने कन्नड चित्रपटसृष्टीला आपल्या केजीएफ सिनेमाने आज प्रसिद्धच्या नव्या शिखरावर पोहोचवले आहे. दरम्यान, ८ जानेवारीला सर्वांच्या लाडक्या यशचा ३७ वा वाढदिवस साजरा झाला. यशला त्याच्या ‘केजीएफ’ या बहुचर्चित चित्रपटातून प्रसिद्धी मिळाली. देशाचा सुपरस्टार म्हटल्या जाणाऱ्या यशचे आयुष्यही तितकेच रोमांचक आहे. त्याची फिल्मी कारकीर्द जेवढी संघर्षाची होती, तेवढीच त्याचे वैयक्तिक आयुष्यही तितकेच कठीण होते. चला तर जाणून घ्या आपल्या लाडक्या यशबद्दल..
यश मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. तो कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील आहे. तुम्हाला माहित आहे का? त्याचे वडील बस ड्रायव्हर आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? आणि ते आजही बस चालवतात.
यशच्या ‘KGF’ आणि ‘KGF 2’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोडले. हे चित्रपट देशातील सर्वाधिक कमाई करणार्या चित्रपटांपैकी एक ठरले आहेत, या सिनेमाचे चाहत्यांनी खूप कौतुक केले होते. यश चित्रपटांमध्ये अभिनय करून करोडो रुपये कमवतो, पण मुलगा एवढा कमावत असतानाही वडिलांनी बस ड्रायव्हिंगचा व्यवसाय सोडला नाही.
याबाबत खुलासा खुद्द यशने त्याच्या एका मुलाखतीत केला होता. त्याने सांगितले की त्याचे वडील अजूनही बस चालवतात. KGF च्या प्री-रिलीज इव्हेंटमध्ये एसएस राजामौली म्हणाले होते, यशचे वडील बस ड्रायव्हर आहेत याचे मला आश्चर्य वाटते. माझ्यासाठी त्याचे वडील यशपेक्षा मोठे स्टार आहेत.
खरेतर, यशचे वडील अरुण कुमार कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळात (KSRTC) बस चालक होते. त्यानंतर ते बंगळुरू मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (BMTC) मध्ये बस चालक झाले. यशच्या वडिलांचा असा विश्वास आहे की, या कामामुळे ते यशला इतके मोठे करू शकले, त्यामुळे ते ही नोकरी कधीच सोडणार नाहीत, असेही ती म्हणाले.
यशने आपल्या करिअरची सुरुवात ‘नंदा गोकुळा’ या टीव्ही सीरियलमधून केली होती. यानंतर तो इतर काही टेलिव्हिजन सोपमध्ये दिसला. आणि गेल्या दशकात यश कन्नड चित्रपट उद्योगातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता बनला आहे. यशने अभिनेत्री राधिका पंडितसोबत लग्न केले आहे. दोघांची भेट ‘नंदा गोकुळा’ या मालिकेदरम्यान झाली होती. यशने २०१६ मध्ये राधिका पंडितशी लग्न केले. यश आणि राधिका यांना दोन मुले आहेत आणि ते नेहमी त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. आणि आता केजीएफ ३ ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.