अर्ध वर्ष सरल तरी रॉकी भाईची जादू कायमच.. केजीएफ २ आजही रेसमध्ये पुढेच

0

सध्या बॉलिवूड विरुद्ध साऊथ असा एक मोठा संग्राम चालत असल्याचे दिसत आहे. एकीकडे बॉक्स ऑफिसवर बॉलिवूडपेक्षा साऊथच्या स्टार आणि सिनेमांची रेलचेल असल्याचं दिसून येत आहे. या वर्षी प्रशांत नीलच्या KGF 2 सिनेमाने उत्कृष्ट कामगिरी करत अनेक रेकॉर्ड मोडून काढले. तस पाहता साऊथच्या एका हिंदी डब व्हर्जन सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणं हे कोणाच्याही कल्पनेच्या बाहेरच होतं. रिलीजनंतर एवढे दिवस झाले तरी सध्या KGF 2 फेम यश म्हणजे रॉकी भाईची जादू कायम असल्याचं दिसत आहे.

सध्या सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष बॉलिवूडच्या बड्या स्टारकडे आहे. जिकडे आमिर अक्षयचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर हवी तशी कामगिरी करण्यात फोल ठरत आहेत तर दुसरीकडे KGF 2 आता टीव्हीवर दिसून येणार असेल तरी त्याची चर्चा अधिक होताना दिसत आहे. येत्या काळात सोनी टीव्हीवर सुद्धा KGF 2 दिसून येणार आहे. २०२२ वर्षात अनेक सिनेमे आले आणि गेले. पण या सिनेमाची क्रेझ तिळमात्र ही कमी झालेली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sony MAX (@sonymax)

त्यातील मोजक्या सिनेमांनी प्रेक्षकांना खुश केलं. यामध्ये मराठी सिनेमे सुद्धा प्रेक्षकांना पसंत पडले पण बॉलिवूडची गाडी अजूनही म्हणावी तशी रुळावर आलेली नाही. या सगळ्यात साऊथचा रॉकिंग स्टार यश मात्र सुपरडुपर हिट ठरला आहे. त्याने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घालत प्रेक्षकांना सलाम रॉकीभाई म्हणायला भाग पाडलं आहे.

यशच्या या अंदाजाला मागच्या काही वर्षात अनेकांनी माज आणि अहंकार असं नाव दिल असल्याचं सांगण्यात येत आहे. या सगळ्याबद्दल यशने नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं, “सर्वांमध्ये कमालीचा आत्मविश्वास असायलाच हवा. कन्नड सिनेमाला आत्ता देशभरात जेवढा सन्मान मिळतो आहे तो याआधी मिळाला असता यावर कोणी विश्वास ठेवेल का? मला याबद्दल अभिमानाने बोलावसं वाटतं.”

देशात हिंदीत रिलीज झालेल्या आत्तापर्यंतच्या कोणत्याही चित्रपटाने पहिल्या आठवड्यात २५० कोटींची कमाई केली नव्हती. ‘केजीएफ २’ ने ही किमया साध्य करत, नवा इतिहास रचला. याचसोबत ‘केजीएफ २’ पहिल्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा पहिला हिंदी चित्रपट बनला. या चित्रपटाने ‘बाहुबली २’ला मागे सारले. रणबीर कपूरच्या ‘संजू’लाही पहिल्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या टॉप ५ च्या यादीतून बाहेर केले.

८ दिवसांत फक्त हिंदी व्हर्जनने एकूण २६८ कोटीं कमावले होते. त्यामुळे आता नक्कीच बॉलीवूड मधील सिनेमांना अगदी कंबर कसून मेहनत घ्यावी लागणार हे नक्की..

Leave A Reply

Your email address will not be published.