गेल्या काही दिवसांपूर्वीच बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भटने तिच्या आयुष्यातील सर्वात गोड बातमी आपल्या फॅन्स सोबत शेअर केलेली. आलिया भट आणि रणबीर कपूर यांचा विवाह सोहळा १४ एप्रिल रोजी पार पडला आणि अवघ्या तीन महिन्यानंतरच आलियाने आपल्या प्रेग्नेंसीची माहिती सगळ्यांना दिली! आता आलिया नंतर यावेळी कॅटरिना कैफ कडून सुद्धा एक गुड न्यूज आलेली आहे! परंतु आपल्याला वाटते तशी ही गुड न्यूज नाही, म्हणजेच कॅटरिना कैफ प्रेग्नेंट नाहीये.
बॉलीवूड मधील सगळ्यांच्या हृदयावर राज्य करणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री कैटरीना कैफ लवकरच रुपेरी पडद्यावर झळकताना दिसणार आहे. कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन या दोघांच्याही ‘भुलभुलय्या 2’ या सिनेमा नंतर आता सिद्धांत चतुर्वेदी, कॅटरिना कैफ आणि ईशान खट्टर अशी तगडी स्टार कास्ट असलेला ‘फोन भूत’ हा हॉरर कॉमेडी सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी आता सज्ज झालेला आहे!
फरहान अख्तर आणि रितेश सिद्धवानी या जोडीच्या एक्सेल एंटरटेनमेंट कडून त्यांच्या या येणाऱ्या सिनेमाच्या
प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.
हा सिनेमा येत्या ७ ऑक्टोबर २०२२ रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. त्याच दिवशी अभिनेत्री कंगना राणावत हिचा ‘तेजस’ हा सिनेमा देखील रिलीज होणार आहे. ‘फोन भुत’ या सिनेमाचे अधिकृत पोस्टर शेअर करताना निर्माता फरान अख्तरने ट्विट केले आहे की, “फोन भूतच्या जगात तुमचे स्वागत आहे. ७ ऑक्टोबर २०२२ या दिवशी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात येत आहे!”
फरहान अख्तर वगळता सिनेमातील बाकी कलाकारांनी ह्याच कॅप्शनसह चित्रपटाचे पोस्टर आपापल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केलेले आहे. या पोस्टर मध्ये कॅटरिना, सिद्धांत आणि ईशान मॅचिंग कपड्यांमध्ये दिसत आहेत. याशिवाय या पोस्टर मध्ये खूप सारी भूत देखील दिसत आहेत.
कॅटरिना कैफने तिच्या इन्स्टा हँडलवर ही पोस्ट शेअर केल्यानंतर लगेचच पती विकी कौशलने कमेंट मध्ये भूत आणि हृदयाचे इमोजी बनवत कॉमेंट केली आहे.
कॅटरिना सोबतच ईशान खट्टरने ही त्याच्या इन्स्टा हँडल वरून हे पोस्टर शेअर केले आहे. पोस्टर वरून तर हा सिनेमा तुफान रहस्यमय वाटत आहे, परंतु फोन भूत हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर कळेल की कॅटरिना कैफ यावेळी कार्तिक आर्यनला बॉक्स ऑफिस कलेक्शन मध्ये मागे टाकू शकेल का ते!
यापूर्वी कॅटरिना कैफने स्वतःचा एक पोलका डॉट्स ड्रेस घातलेला फोटो पोस्ट केला होता, त्यावेळी तिच्या फॅन्सने कॅटरिना प्रेग्नेंट आहे असा अंदाज लावला होता. मात्र या गोष्टीची अजूनही कोणतीच अधिकृत माहिती मिळालेली नाहीये.