अखेर अत्यंत खाजगी पणाने लग्न करण्यामागचे कारण कॅटरिनाने केले उघड! म्हणाली असे..

बॉलीवूडच्या चंदेरी दुनियातील एक चमचमता चेहरा म्हणजे अभिनेत्री कैटरीना कैफ आणि प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल यांची जोडी! मागील वर्षी डिसेंबर महिन्यात विकी आणि कॅटरिनानी राजस्थान मधील एका रिसॉर्ट मध्ये लग्न गाठ बांधली. त्यांच्या लग्न संबंधितल्या बातम्यांमधील सर्वकाही माहिती लीक झाली असली तरीही, त्यांच्या लग्नाची बातमी आणि फोटो मीडियासमोर येऊ नये यासाठी दोघांनी भरपूर काळजी घेत त्याप्रमाणे प्रयत्नही केले होते! लग्न होईपर्यंत दोघांनी मीडियाला कोणतीही माहिती दिली नाही आणि त्यानंतर मात्र लग्नाचे फोटो सोशल मीडिया वरती शेअर केले. त्यांनी लग्न इतके गुप्त ठेवल्यामुळे या दोघांवरती त्यावेळी अनेक मीमस् ही बनवण्यात आले होते. यावेळी मात्र कॅटरिना कैफने लग्न होईपर्यंत तिने या प्रश्नाचे उत्तर का नाही दिले? याबाबतचा खुलासा केलेला आहे.

 

अभिनेत्री कैटरीना कैफ आणि अभिनेता विकी कौशल मंगळवारी फिल्म फेअरच्या रेड कार्पेट वर उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांमध्ये दोघेही अनेक वेळा एकत्र बसलेले दिसले. यावेळी विकी कौशल याला ‘सरदार उधमसिंग’ साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला, तेव्हा कॅटरिनाने त्याच्या गालावर किस केले.

यावेळी कॅटरिनाला अनेक प्रश्न विचारण्यात आले. जेव्हा तिला विचारण्यात आले की तिने एवढ्या गुप्तपणे लग्न का केले? त्यावेळी तिने सांगितले,

” मला वाटते लग्न खाजगी ठेवण्यापेक्षा कोरोना प्रादुर्भावामुळे आम्हाला असे करावे लागले. माझ्या कुटुंबातील काही सदस्यांनाही कोरोना झाला होता. त्यामुळे आम्हाला ते अतिशय गांभीर्याने घ्यावे लागले, हे वर्ष तसं खूप चांगलं गेलं होतं, परंतु कोरोनामुळे आम्हाला थोडा जास्त सावध व्हायला लागलं! लग्न छान पार पडलं, आम्ही दोघेही खूप आनंदी आहोत”
असेही कॅटरिना यावेळी म्हणाली.

कॅटरिना कैफ आगामी काळात तिच्या हॉरर कॉमेडी ‘फोन भूत’ नावाच्या सिनेमामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट ४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर कॅटरिनाने सलमान खान सोबत टायगरच्या तिसऱ्या भागाचे चित्रीकरणही पूर्ण केलेले आहे आणि त्यानंतर ती ‘मेरी क्रिसमस’ या नावाच्या सिनेमा मध्ये तमिळ मधील सुपरस्टार विजय सेतुपती सोबत झळकताना दिसणार आहे.

बॉलिवूड क्यूट कपल्सच्या यादीमध्ये कॅटरिना आणि विकीच्या जोडीचा समावेश झाला आहे. दोघेही हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टार कलाकार आहेत. पण अभिनय क्षेत्रात असूनही त्यांनी कधीही एकत्र काम केले नाही. या जोडीला ऑनस्क्रीन एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. ‘इंडिया टूडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, कॅटरिना-विकी हे एकत्रितपणे एका जाहिरातीमध्ये झळकणार आहेत.

 

Leave a Comment

Close Visit uttamsheti