कार्तिक आर्यनच्या लव्ह लाईफचा बोलबाला.. म्हणाला, “मी स्वतःला नशीबवान समजत नाही..”

बॉलीवूड मध्ये सध्या आपल्या अभिनयाने आणि गुड लूक्स ने चाहत्यांना भुरळ पाडणाऱ्या कार्तिक आर्यनचासगळीकडे बोलबाला सुरू आहे. गेल्या काही काळात तो चांगलाच फॉर्म मध्ये आला आहे. त्याच्या भुल भुलैय्या सिनेमाने प्रेक्षकांना चांगलच वेड लावले. पण सध्या तो त्याच्या लव्ह लाईफ मुळे चर्चेत आला आहे. आपल्या लव्ह लाईफ वर त्याने केलेल्या वक्तव्यामुळे नेटकऱ्यांच्या चर्चेला आता चांगलच उधाण आले आहे.

एका मुलाखतीत त्याच्या लव्ह लाइफबद्दल तो म्हणाला की, प्रेमाच्या बाबतीत तो स्वतःला भाग्यवान समजत नाही. जेव्हा कार्तिकला त्याच्या लव्ह लाइफबद्दल प्रश्न केले गेले तेव्हा तो म्हणाला, “आयुष्यात खरे प्रेम मिळण्यासाठी तुम्ही खूप भाग्यवान असलं पाहिजे. कदाचित मी आतापर्यंत इतका भाग्यवान नव्हतो.

तो सध्या निश्चितपणे अविवाहित असल्याचे त्याने ठामपणे सांगितले. ‘कॉफी विथ करण’वरील बडबडच्या पार्श्वभूमीवर त्याच्या लव्ह लाईफबद्दलची त्याची मागील विधाने खोटी असल्याचे सांगण्यात आल्यावर, कार्तिकने फिल्म कम्पेनियनला सांगितले, “मी तेव्हापासून सिंगल आहे. गेली १.२५ वर्षे, मला इतर कशाचीही माहिती नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

पुढे तो म्हणाला, “मी गेल्या 1 वर्षापासून सिंगल आहे.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “मी सिंगल आहे. आणि हे खर आहे,” तो म्हणाला.

कार्तिक आर्यनला ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून बॉलीवुड मध्ये पदार्पण केले. चित्रपटातील त्याचे काही डायलॉग प्रेक्षकांमध्ये बरेच लोकप्रिय झाले होते. या चित्रपटाचा सीक्वल ‘सोनू के टीटू की स्वीटी’ २०१८ साली रिलीज झाला होता. कार्तिक आर्यन त्याच्या फिल्मी करिअरबद्दल म्हणाला, “माझी स्वप्नं होती, ज्यांच्यासह मी मुंबईत आलो. ती स्वप्नं आता पूर्ण होत आहेत.”

कार्तिक आर्यनची दिवसेंदिवस लोकप्रिय होत चांगला आहे. तो शेवटचा ‘भूल भुलैया २’ मध्ये दिसला होता, ज्यामध्ये त्याने रूह बाबाची भूमिका साकारली होती. बॉलीवूडचे बहुतेक चित्रपट फ्लॉप होत असताना हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. आपल्या यशाबद्दल कार्तिक म्हणाला, “मला लोकांचे मनोरंजन करायला आवडते. माझ्या चित्रपटांना लोक ज्या प्रकारे प्रतिसाद देत आहेत त्यामुळे मी खूप खूश आहे.”

कार्तिकने अलीकडेच साजिद नाडियादवाला आणि कबीर खान यांसारख्या लोकांसोबत चित्रपटात काम करण्यास होकार दिला. दरम्यान तो अनुराग बसू सोबत, तो पूर्णपणे नवीन मैदानात उतरला आहे. हा आशिकी फ्रँचायझी आशिकी 3 मध्ये लवकरच दिसून येणार आहे.!

Leave a Comment

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप