सफरचंद खात पोझ देणारी या चिमुकलीने गाजवले आहे बॉलिवूड.. कोण आहे ओळखलंत का?
सोशल मीडियावर मोठ मोठ्या सेलिब्रिटींचे लहानपणीचे फोटो व्हायरल होत असतात. जे पोस्ट करून सेलिब्रिटी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देतात तर ते फोटो पाहून चाहते आनंद घेतात. सध्या असाच एका लोकप्रिय अभिनेत्रीचा लहानपणीचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोतल्या चिमुरडीला पाहून अनेकांना त्यांचं बालपण आठवलं असेल. पण फोटो मध्ये दिसणाऱ्या या चिमुकलीचा गोंडस चेहरा पाहून कोणीही तिचा हा फोटो तासंतास पाहू शकतो.पण ही अभिनेत्री कोण आहे ओळखलंत का? व्हायरल होणारा हा फोटो बॉलिवूडमधला एक काळ गाजवलेल्या एका आघाडीच्या अभिनेत्रीच्या बालपणीचा फोटो आहे.
फोटोत सफरचंद खाणारी ही चिमुकली बॉलिवूडमधल्या सर्वांत मोठ्या आणि प्रसिद्ध कुटुंबातील आहे. तिचे डोळे पाहिल्यानंतर चाहत्यांनी ती कोण असेल याबाबत अंदाज बांधला. तस पाहता या मुलीचे डोळे बॉलिवूडच्या कपूर घराण्याकडे इशारा करतात. या कुटुंबातल्या बहुतांश सदस्यांच्या डोळ्यांची ठेवण आणि रंग सारखाच आहे.तर ही आहे ९० चा दशक गाजवणारी हिरॉइन नंबर १ आणि बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री करिश्मा कपूर..
छोटी करिष्मा सफरचंद खाताना कॅमेराकडे पाहत पोझ देत आहे. करिष्माने हा फोटो खूप दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. तो सध्या व्हायरल होत आहे. चाहत्यांनी या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत. एका युझरने करिष्माने अभिनय केलेल्या एका चित्रपटाच्या गीतातल्या ओळी कमेंटमध्ये लिहिल्या आहेत. तो म्हणतो, ‘छोटी सी प्यारी सी नन्ही सी…’ आणखी एका युझरने ‘गोलू मोलू लोलो’ अशी कमेंट केली आहे. काही फॅन्स करिष्माला तिच्या बालपणीचे आणखी काही फोटो शेअर करण्यास कमेंटमध्ये रिक्वेस्ट करत आहेत.
करिश्माने ९०च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आणि त्या प्रचंड गाजल्याही.मात्र सध्या ती चित्रपटसृष्टीत पासून चार हात लांबच असते. तिचा काही वर्षांपूर्वी तिचा पहिल्या पतीपासून घटस्फोट झाला आहे. करिष्मा कपूरने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अभिनेता गोविंदासोबत तिची केमिस्ट्री आजही चाहत्यांच्या मनाला भावते. दिल तो पागल है आणि राजा हिंदुस्थानी या दोन चित्रपटांमधल्या तिच्या भूमिका विशेष गाजल्या. अनाडी, हिरो नं. 1, कुली नं. 1 हे सुपरहिट सिनेमे तिने केले.
दरम्यान, ती पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. पण ती केव्हा लग्न करेल याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये चालू असते.