बेबो आहे तिसऱ्यांदा गरोदर? सोशल मीडियावर बेबी बंपचा फोटो झाला व्हायरल..
बॉलिवूडची बेबो अर्थात अभिनेत्री करीना कपूर खान ही कलाविश्वासोबतच नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. तिने आजवर तिच्या दर्जेदार अभिनयाने चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. पण सध्या सोशल मीडियावर करिनाचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे ज्यामुळे तिचे चाहते पेचात पडले आहेत. या फोटोवरून स्पष्ट होत आहे की, करीना प्रेग्नेंट आहे. फोटोमध्ये करिनाचा बेबी बंप देखील स्पष्ट दिसत आहे आणि हे पाहून चाहते ती तिसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याचा अंदाज लावत आहेत!
पण व्हायरल होणारा हा फोटो खरंतर जुलै महिन्यातला ज्यावेळी अभिनेत्री आपल्या कुटूंबासोबत लंडनला होती. करीना कपूरच्या या व्हेकेशनमध्ये तिच्यासोबत बहीण करिश्मा कपूर आणि बेस्ट फ्रेंड अमृता अरोराही दिसत आहे. या ट्रिपमध्ये ती खूप मजा करताना दिसत आहे दरम्यान, तिचा एक फोटो व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती सैफ आणि एका व्यक्तीसोबत दिसत आहे.
या फोटोमुळे चाहत्यांच्या मनात तिच्या प्रेग्नसी बद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत. वास्तविक, काळ्या रंगाचा टँक टॉप घातलेली करीना कपूर या फोटोत प्रेग्नंट दिसत आहे. तिचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. करीना पुन्हा प्रेग्नंट आहे का, असा सवाल करत चाहते कमेंट करत आहेत.
करिनाचा हा फोटो पाहून चाहते कमेंटचा वर्षाव करत आहेत. कोणीतरी विचारत आहे की ती पुन्हा प्रेग्नंट आहे का त्याचवेळी, कोणीतरी ती तिसऱ्यांदा आई होणार आहे का ? अशा कमेंट्स केल्या आहेत. याचबरोबर चाहत्यांनी करिनाच्या संपूर्ण ट्रिपचे फोटो पाहिल्यानंतर बहुतांश फोटोंमध्ये करीना मागे उभी दिसत आहे. काहींमध्ये तिने सैल कपडे घातले आहेत तर काहींमध्ये पोटासमोर हात ठेवलेला दिसत आहे. त्यामुळे या चर्चांना उधाण आलं आहे.
आता या बातमीत कितपत तथ्य आहे, हे फक्त करीना कपूर आणि तिच्या कुटुंबीयांनाच माहिती पण पब्लिकपर्यंत या बातम्या पोहोचतच राहणार हे नक्की आहे. सध्या तरी तिने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. काही लोकांचं असंही म्हणणं आहे की, हा फोटो फोटोशॉप करून एडिट करण्यात आला आहे.
करीना कपूरने २०१२ मध्ये सैफ अली खानसोबत लग्न केलं. २०१६ मध्ये करिना पहिल्यांदा आई बनली त्यावेळी तिने तैमूरला जन्म दिला. यानंतर २०२१ मध्ये आणखी एका मुलाचा जन्म झाला, ज्याचं नाव जेह आहे. तिच्या दोन्ही मुलांच्या नावावरून बराच वाद झाला होता.