राणादा-पाठक बाईंनंतर या लोकप्रिय अभिनेत्रीने गुपचूप उरकले लग्न.. सोशल मीडियावर फोटोज् झाले व्हायरल

0

सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीपासून ते मराठी इंडस्ट्रीपर्यंत सगळीकडे लगीन घाई पहायला मिळत आहे. छोट्या पडद्यावरील बऱ्याच कलाकारांनी या काळात लग्न आणि साखरपुडा उरकल्याच्या बातम्या समोर येत आहेत. नुकताच छोट्या पडद्यावरील हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचा दिमाखदार विवाहसोहळा पार पडला. तसाच काहीसा आलिशान विवाहसोहळा बॉलिवूड अभिनेत्री हंसिका मोटवानीचा ही पहायला मिळाला. आता y यादीत आणखी एक लोकप्रिय अभिनेत्रीचं नाव सामील झालं आहे. तिने आपल्या प्रियकारासोबत गुपचूप नागपूरमध्ये लग्न उरकलं आहे. आता या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

छोट्या पडद्यावरील अँड टिव्ही वाहिनीवर ‘हप्‍पू की उलटन पलटन’फेम कामना पाठकनं अभिनेता संदीप श्रीधरसोबत विवाह केला आहे. ८ डिसेंबर रोजी नागपूरमध्ये हा विवाहसोहळा संपन्न झाला. अगदी पारंपारिक मराठी पद्धतीने तिचा हा लग्न सोहळा पार पडला. या विवाहसोहळ्याला कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईक उपस्थित होते. हा विवाहसोहळा चार दिवस रंगला. पहिले दोन दिवस मेहेंदी, संगीत हे लग्नापूर्वीचे कार्यक्रम थाटामटात पार पडले.

पती संदीप श्रीधरबाबत बोलताना ती म्हणाली , “आम्‍ही अनेक वर्षांपासून रंगभूमीच्‍या माध्‍यमातून एकमेकांना ओळखत होतो आणि आमच्‍यामध्‍ये चांगली मैत्री देखील होती, ज्‍यानंतर आमच्‍यामध्‍ये प्रेम बहरू लागले. आम्‍हा दोघांना आमच्‍या कलेप्रती प्रेम व आवड आहे, ज्‍यामुळेच आम्‍ही एकत्र आलो. असे म्‍हणतात की विवाहाच्‍या वेळी घाबरायला होते, नर्व्हस वाटते. पण मी स्‍वत:ला वधूच्‍या पोशाखामध्‍ये पाहिले आणि सर्व भिती निघून गेली. तो देखील माझ्या स्‍वप्‍नातील राजकुमारासारखा दिसत होता. आम्‍ही पती-पत्‍नी म्‍हणून आमच्‍या नवीन जीवनप्रवासाला सुरूवात करण्‍यास खूपच उत्‍सुक आहोत. संदीप खूप काळजी घेणारा व प्रोत्‍साहन देणारा आहे. मी माझा जीवनसोबती म्‍हणून माझा जिवलग मित्र असल्‍याने स्‍वत:ला नशीबवान मानते.’’

पुढे ती म्हणाली,’२०१४ साली मुंबईत एका नाटकादरम्यान तिची संदीपशी भेट झाली. ते पहिल्या नजरेच प्रेम होत. त्यावेळी मी त्याला याबद्दल सांगितले नसले तरी त्यानंतर आम्ही अनेक कार्यशाळांना एकत्र हजेरी लावली आणि नाटकावर काम केले.” अशा परिस्थितीत लग्नानंतर ती हनिमूनला जाणार नसून लवकरच कामावर परतणार असल्याचेही सांगण्यात आले.

जरी लग्नामुळे शोमधून सुट्टी घेतली आहे, पण तिच्या चाहत्यांनी निराश होऊ नये कारण लवकरच कामना पुन्हा शोमध्ये दिसणार आहे. सध्या ते केवळ १५ दिवसांच्या रजेवर आहेत. लग्नाचे सर्व विधी आटोपताच ती लगेच मुंबईत येऊन शूटिंगला सुरुवात करणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.