लग्नानंतर एक वर्षाने कतरिना कैफ-विकी कौशल देणार गुडन्यूज? ख्रिसमस सेलिब्रेशनच्या ‘त्या’ फोटोंमुळे चर्चेला उधाण

0

अलीकडे बॉलीवूडमध्ये गोड बातम्या ऐकण्यात येण्याचे प्रमाण वाढले आहे. बॉलीवूड मधील काही लाडक्या जोड्या लग्न बंधनात अडकत आहेत तर काहींच्या घरी नवा पाहुणा येत आहे. ज्यामुळे सर्वत्र आनंदाचे आणि चर्चेचे वातावरण आहे. पण काही वेळा आपण पाहतो की, हे स्टार्स आपल्या काही खास बातम्या सिक्रेट ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. पण आताच्या या सोशल मीडियाच्या जमान्यात जास्त वेळ कोणती गोष्ट लपून राहणे तितकेच अवघड आहे नाही का? कारण यह पब्लिक है सब जानती है!

दरम्यान, बॉलीवूड मधील नेहमीच चर्चेत असणाऱ्या रोमँटिक कपल कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्याबाबत एक भन्नाट चर्चा समोर येत आहे.जी ऐकून तुम्ही सुद्धा यात रस घेण्यासाठी तयार व्हाल.

नुकताच ख्रिसमस पार पडला आहे. आणि या लाडक्या जोडप्याने हा ख्रिसमस त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत साजरा केला. यावेळी सिनेसृष्टीतील त्यांचे क्लोज फ्रेंड्स नी देखील पार्टीत उपस्थित दर्शवली होती. दरम्यान, या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे ते एका कारणानं … हे फोटो पाहून कतरिना कैफ प्रेग्नंट आहे का? असा प्रश्न पुन्हा पुन्हा नेटकरी करत आहेत.

नेटकऱ्याना असे वाटण्याचे साहजिक कारण हे की, प्रत्येक फोटोमध्ये कतरिना ही फोटो काढताना कोणा नं कोणाच्या मागे लपताना दिसली. आणि म्हणूनच कतरिनाचे फोटो पाहून लोकांनी अंदाज लावला की ती प्रेग्नंट आहे.

कतरिना आणि विकीने लग्नानंतरचा त्यांचा दुसरा ख्रिसमस फॅमिली आणि मैत्रपरिवारा सोबत आनंदाने साजरा केला. कतरिनाने एक फोटो शेअर केला आहे, ज्यात ती विकी कौशल, तिची बहीण, फॅमिलीत अशा सगळ्यांच्या मागे उभी आहे. इतकेच नव्हेतर तर नेहा धुपीया आणि अंगद बेदी सोबतच्या फोटोतही ती मागे उभी होती. त्यामुळे आता एकच चर्चा आहे कतरिना कैफ बेबी बंप लपवत आहे की काय?

प्रत्येक फोटोमध्ये एक गोष्ट लोकांच्या लक्षात आली की प्रत्येक फोटोमध्ये कतरिना कोणाच्या ना कोणाच्या मागे उभी होती. एका यूजरने स्पष्टपणे लिहिले की, “कतरिना जाणूनबुजून अशा अँगलने उभी होती की तिचं बेबी बंप दिसृ नये. ही तर प्रेग्नंट दिसत असल्याचे लोकांनी स्पष्टपणे लिहिले आहे.

इतकेच नव्हे तर मध्यंतरी कतरिना कैफ एका अवॉर्ड शोम गेली होती. कतरिनाचा आकर्षक लूक पाहून चाहत्यांचे लक्ष तिच्या पोटाकडे गेले. त्या व्हिडिओमध्ये कतरिनाचे बेबी बंप दिसत होतं. असे काहींचे म्हणणे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप