कोण आहे हा चिमुकला..? रेखाच्या मांडीवर बसून काढलाय फोटो, आता झालाय मोठा..

मित्रहो अभिनेत्री रेखा ही आजदेखील अनेकांच्या हृदयाची धडधड आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी लोक खूप उत्सुक असतात. आजपर्यंत तिने बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट मिळवून दिले आहेत, तिच्या प्रत्येक भूमिकेत तिने असा काही जिवंतपणा घातला आहे की ते चित्रपट पाहत असताना रसिक मंडळी आपले लक्ष केंद्रित करून असतात. तिचे फक्कड नृत्य सादर होत असताना तिला पाहण्यासाठी अनेकांची गर्दी होते, बॉलिवूड मधील अनेक नवख्या अभिनेत्री तिच्या समोर क्षुल्लक वाटतात. तिच्या चित्तवेधक रूपावर आजदेखील लोक फिदा आहेत.

 

८० ते ९० च्या दशकात तिने बॉलिवूडवर भरपूर राज्य केले आहे, आपल्या खास अदांनी अनेकांना घायाळ केले आहे आणि आजही करत असते. हल्ली सोशल मीडियावर देखील सक्रिय असणारी रेखा अलीकडे एका फोटोतून विशेष लक्षवेधी ठरत आहे. तिच्या या फोटोमध्ये तिच्या सोबत एक चिमुकला सुद्धा दिसून येत आहे. अनेक नेटकरी हा फोटो पाहून चकित झाले असून, यामधील हा चिमुकला कोण आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे.हा लहान मुलगा नेमका कोण याचा अनेकजण शोध घेत आहेत. जर तुम्ही देखील शोध घेत असाल तर मित्रहो आज या लेखातून तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर नक्की मिळेल.

मित्रहो ९० च्या दशकातील “मोहब्बते” चित्रपट पाहिला असाल, यातून अभिनेता शाहरुख खान आणि त्याच्या सोबत तीन प्रेमीयुगल प्रचंड गाजले होते. यातील गाणी आणि कथा विशेष लोकप्रिय झाली आहे. यातीलच एक अभिनेता ज्याने आपल्या निळ्या डोळ्यांनी सर्वाना हृदयांगम करून टाकले होते, तोच जुगल हंसराज. तर मित्रहो व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये रेखाच्या मांडीवर जुगलच बसलेला आहे. त्याने अभिनेत्री रेखाच्या मांडीवर बसून फोटो काढला आहे. जुगल लहानपणापासून खूप छान दिसतो. त्याचा क्युटनेस नेहमीच तरुणींना खेचून घेतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jugal Hansraj (@thejugalhansraj)

“मोहब्बते” चित्रपटातील त्याची भूमिका अतिशय लोकप्रिय झाली असून या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने कलाविश्वात आपले एक खास स्थान निर्माण केले आहे. हँडसम जुगलने २०१४ साली जास्मीन ढिल्लन सोबत लग्न केले आहे. या दोघांची लव्हस्टोरी देखील खूप आकर्षक आहे, बराच काळ ते दोघे एकमेकांना डेट करत होते. या जोडीची केमिस्ट्री सुद्धा अनेक चाहत्यांना माहीत असून लोकप्रिय आहे. लग्नानंतर जुगल हा आपल्या पत्नीसोबत अमेरिकेत स्थायिक झाला आहे. सोशल मीडियावर तो सक्रिय असतो. मात्र मनोरंजन पडद्या पासून तो खूप दुरावला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jugal Hansraj (@thejugalhansraj)

मात्र तरीही या चॉकलेट बॉयची क्रेझ आजदेखील बॉलिवूड मध्ये आहेच, लहानपणी अनेक चित्रपटात त्याने बालकलाकार म्हणून काम केले आहे. त्याच्या खूपशा भूमिकांना विशेष लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली आहे. तो लहानपणी खूपच गोंडस आणि क्युट दिसायचा आणि आज देखील मोठा झाल्यावर तो खूप हँडसम दिसतो. त्याची एक झलक पाहण्यासाठी तरुणी खूप आतुर असतात. या चॉकलेट बॉयला अशीच लोकप्रियता मिळत राहो ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Leave a Comment

Close Visit uttamsheti