ऐश्वर्या राय सोबत सिनेमात काम करणारी ही अभिनेत्री आज लाखो चाहत्यांच्या मनावर करतेय राज.. कोण आहे ओळखलंत का?

0

बॉलिवूड आणि टेलिव्हिजनवरील असे बरेच प्रसिद्ध कलाकार आहेत ज्यांनी आपल्या अभिनयाचा प्रवास एक बालकार म्हणून केला. हे बालकलाकार आजही कलाविश्र्वात सक्रिय आहेत. इतकच काय तर त्यांचे सोशल मीडियावर मोठं फॅन फॉलोईंगदेखील आहे.आम्ही आज तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांंगणार आहोत जी ऐश्वर्या राय बच्चनसोबत ‘कुछ ना कहो’ सिनेमात दिसली होती. तिने या सिनेमात पूजाची भूमिका साकारली होती. तिने फक्त ऐश्वर्या रायसोबतच नाही तर राणी मुखर्जी, आमिर खानसोबत सुद्धा काचलाम केलं आहे.

फोटो पाहून तुम्ही या अभिनेत्रीला ओळलंत का? , ही बालकलाकार टीव्ही जगतातील प्रसिद्ध चेहरा आहे. आपल्या दमदार अदाकारीने आणि अदांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री जेनिफर विंगेट हे आज टेलिव्हिजन विश्वात मोठं नाव आहे. वयाच्या १३ व्या वर्षीच तिने अभिनयाला सुरुवात केली. सर्वप्रथम जेनिफरने शाका लाका बूम बूम या मालिकेतून बालकलाकार म्हणून डेब्यू केलं आणि आज अनेक अभिनेत्रींना टक्कर देत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jennifer Winget (@jenniferwinget1)

ती लहानपणापासूनच टीव्ही जगतात सक्रिय आहे. तिने स्टार प्रवाह वाहिनीवरील सरस्वती चंद्रमधील कुमुद देसाईचे निरागस पात्र साकारले तर सोनी टिव्हीवर तिने बेहद मालिकेत अतिशय क्रूर अशा माया मल्होत्राचे पात्र साकारले. तर कलर्स वाहिनीवरील बेपनाह मधील झोया सिद्दिकीच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले. जेनिफर विंगेटने साकारलेल्या या एक से एक भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या. बेहादनंतर ती बेहद २ च्या सिक्वेलमध्येही दिसली. यामध्ये त्यांचे सहकलाकार आशिष चौधरी आणि शिवीन नारंग होते.

दरम्यान, तिला कला विश्र्वाप्रमाणे तिच्या वैयक्तिक आयुष्यातही तिला स्ट्रगल करावा लागला. साल २००५ मध्ये तिने तिचा को-स्टार करण सिंग ग्रोव्हरला डेट करायला सुरुवात केली. ‘कसौटी जिंदगी की’ या टीव्ही शोच्या सेटवर तिची भेट झाली. त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. ९ एप्रिल २०१२ रोजी करण आणि जेनिफर दोघांचे लग्न झाले. लग्नाच्या २ वर्षानंतर २०१४ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jennifer Winget (@jenniferwinget1)

जेनिफर विंगेटची गणना टीव्हीच्या टॉप अभिनेत्रींमध्ये केली जाते. जेनिफर तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याबद्दलही खूप चर्चेत असते. जेनिफर विंगेटची गणना टीव्हीच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये केली जाते. तर अभिनेत्रीच्या पहिल्या पगाराबद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. जेनिफर विंगेट ११वीत शिकत असताना तिने एका मासिकासाठी प्रिंट जाहिरात शूट केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.