छोटया पडद्यावर गेल्या काही वर्षांपुर्वी जय मल्हार’ या मालिकेने अख्ख्या महाराष्ट्राला खंडोबा देवाचे दर्शन घडवून दिले होते. आणि या मालिकेत खंडोबा देवाची भूमिका साकारणारा अभिनेता देवदत्त नागे सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर चढाई करत आहे. मराठी टेलिव्हिजन गाजवल्यानंतर देवदत्तनं बॉलिवूडमध्येही आपली अशी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. जय मल्हारनंतर देवदत्तनं पौराणिक मालिकांचा लेबल हटवत नव्या विषयाची मालिका केली. ‘डॉक्टर डॉन’ या मालिकेनंतर देवदत्त नागे अनेक महिन्यांनी टेलिव्हिजनवर परतला आहे.
देवदत्त सध्या कलर्स मराठीवरील ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत देवदत्त खलनायकाच्या भूमिकेत अगदी उठून दिसत आहे. काही दिवसांआधीच देवदत्त नागेनं या मालिकेत एंट्री घेतली होती. पण आता काही दिवसातच त्याला अचानकपणे मालिकेतून ब्रेक घ्यावा लागतोय. मालिकेतून ब्रेक घेण्याचं नेमकं कारण काय? त्याने सोशल मीडियावर उघड केले आहे.
जीव माझा गुंतला मालिकेच्या शुटींगवेळी देवदत्तला दुखापत झाली आहे. याबाबत माहिती देताना त्याने इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याचे काही फोटो शेयर केले आहेत. ज्यात त्याच्या डाव्या डोळ्याला जखम झाली आहे. जखमेमुळे डाव्या डोळ्याल सुज आली आहे. यामध्ये सरळ दिसून येत आहे की, त्याच्या डोळ्याला जबरदस्त मार लागला असून डोळ्याल गंभीर दुखापत होता होता वाचली.. या दुखापतीमुळेच देवदत्तनं काही दिवसांसाठी मालिकेतून ब्रेक घेतला आहे.
देवदत्तनं डोळ्याला दुखापत झालेला फोटो शेअर करत म्हटलंय, ‘आता काही दिवसांसाठी आराम. जीव माझा गुंतला मालिकेच्या सेटवर शुटींगवेळी छोटी दुखापत झाली आहे. देवाच्या कृपेनं माझा डोळा थोडक्यात वाचला’. त्यामुळे आता देवदत्त पुढचे काही दिवस जीव माझा गुंतला मालिकेत दिसणार नाहीये. देवदत्तच्या या पोस्टनंतर त्याच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
देवदत्त नागे आपल्याला बऱ्याच दिवसांनी मालिकेत काम करताना दिसत आहे. सध्या तो बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करताना दिसत आहे. अजय देवगनच्या तानाजी या चित्रपटामध्ये त्याने महत्वाची भूमिका साकारली होती. तसेच आता देवदत्त ‘आदिपुरुष’ या चित्रपट सुद्धा दिसणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.
देवदत्त गजानन नागेने ‘वीर शिवाजी’, , ‘बाजीराव मस्तानी’ यांसारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केलं आहे. तो महाराष्ट्रातील अलिबागचा रहिवासी आहे. सध्या पत्नी कांचन नागेसोबत तो मुंबईत राहत आहे. त्याचं वय सध्या ४१ वर्षे आहे. देवदत्तने हिंदीतून ‘वीर शिवाजी’ या मालिकेतून टीव्हीमध्ये पदार्पण केलं. त्यात त्यांने ‘तानाजी मालुसरे’ ही व्यक्तिरेखा साकारली होती. याशिवाय तो ‘लागी तुझसे लगन’मध्येही दिसला होता