इशान किशनला लागली लॉटरी, विश्वचषक फायनल खेळण्याचा निर्णय आता या दुखापत खेळाडूच्या जागी खेळणार । Ishan Kishan

इशान किशन(Ishan Kishan): विश्वचषक २०२३ आता अंतिम फेरीत पोहोचला आहे. वर्ल्ड कप 2023 चा पहिला सेमीफायनल सामना टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात काल म्हणजेच 15 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला.

 

ज्यामध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 19 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल. आज 16 नोव्हेंबर रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वर्ल्ड कप 2023 चा दुसरा सेमीफायनल सामना खेळला जात आहे.

बेन स्टोक्सने केले दोन मोठे भाकीत, सांगितले हा होणार 2023 चा विश्वचषक विजेता । World Cup winner

हा सामना जिंकणारा संघ 19 नोव्हेंबरला अहमदाबादमध्ये टीम इंडियाविरुद्ध फायनल खेळेल. टीम इंडियासाठी बातमी येत आहे की अंतिम सामन्यात इशान किशनला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळणार आहे. इशान किशन या जखमी खेळाडूची जागा घेऊ शकतो.

शुभमन गिल अंतिम सामन्यातून बाहेर होऊ शकतो
शुभमन गिल
टीम इंडियाचा स्टार सलामीवीर शुभमन गिलने वर्ल्ड कप 2023 मध्ये आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. कर्णधार रोहित शर्मासोबत त्याने टीम इंडियाला शानदार सुरुवात करण्याचे काम केले आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यातही शुभमन गिलने शानदार फलंदाजी करत 80 धावांची नाबाद खेळी केली.

चाहत्यांसाठी वाईट बातमी, मोहम्मद सिराज उपांत्य फेरीच्या सामन्यातून बाहेर, या खेळाडूची जागा घेणार । semi-final match

शुभमन गिल रोहित शर्मासोबत सलामीला आला होता. मात्र मुंबईच्या कडक उन्हामुळे त्यांना पेटके उठले. त्यामुळे त्याला मैदानाबाहेर जावे लागले. मात्र, अखेरच्या काही षटकांत त्याने दमदार पुनरागमन केले. मात्र त्याच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती नाही आणि जर तो पूर्णपणे बरा झाला नाही तर तो अंतिम सामन्यातून बाहेर पडू शकतो.

इशान किशनला संधी मिळू शकते
जर टीम इंडियाचा स्टार सलामीवीर शुभमन गिल 19 नोव्हेंबरला अहमदाबादमध्ये खेळल्या जाणाऱ्या अंतिम सामन्यातून बाहेर पडला तर टीम इंडियासाठी चिंतेची बाब ठरू शकते. पण टीम इंडियाकडे त्याच्यासाठी बेंचवर एक चांगला पर्याय आहे. शुभमन गिल खेळू शकला नाही तर अंतिम सामन्याच्या प्लेइंग 11 मध्ये त्याच्या जागी इशान किशन खेळू शकतो.

धोनीचे ट्रम्प कार्ड थेट अंतिम सामन्यात दाखल, रोहित शर्मा देईल चॅम्पियन बनण्याची शेवटची संधी. | Rohit Sharma

Leave a Comment

Close Visit Np online