जय मल्हार मालिकेतील बानूचे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीचे फोटो होत आहेत सोशल मीडियावर व्हायरल! नवीन लुक पाहून वाटेल आश्चर्य!!
काही वर्षांपूर्वी झी मराठीवर आलेल्या जय मल्हार या मालिकेला प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या टीआरपीने एका वेगळ्याच उंचीवर नेऊन पोहोचवले होते. त्यातील मल्हार, बानू आणि म्हाळसा या तीनही पात्रांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आणि ही मालिका महाराष्ट्राच्या घराघरात जाऊन पोहोचली! या मालिकेच्या प्रसिद्धीच्या जोरावरच यातील अनेक पात्रांना खऱ्या आयुष्यात मोठी ओळख निर्माण करता आली आणि ह्याच लोकप्रियतेच्या जोरावर यातील बानू हे पात्र लोकांच्या विशेष पसंतीस उतरलं! बानूची ही भूमिका निभावली ती अभिनेत्री ईशा केसकर हिने!
अभिनेत्री इशा केसकरने तिच्या जीवनात केलेली ही भूमिका तिच्या वैयक्तिक आयुष्यापेक्षाही अत्यंत वेगळी ठरली होती, अनेक वेळा ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईशा या भूमिकेबद्दल व्यक्त झालेली दिसते. कॉलेजमध्ये असताना इशा मराठी सिनेसृष्टीत येण्याच्या प्रयत्नात होती. तिचे शालेय शिक्षण पुण्यातील सिंहगड शाळेतून तर कॉलेजमधील शिक्षण सिम्बॉयसिस येथून पूर्ण केल आहे. त्यावेळी महाविद्यालयात असताना ती पुरुषोत्तम करंडक, सवाई नाटक अशा नाट्य स्पर्धांमधून पुढे येत गेली. यानंतर तिने अनेक एकांकिकांमध्ये देखील महत्त्वपूर्ण भूमिका निभावल्या, ज्यातून तिची वर्णी थेट जय मल्हार मालिकेतील बानू या भूमिके करता लागली!
View this post on Instagram
या मालिकेतून तिने अनेक रसिक प्रेक्षकांच्या मनावर आपला वेगळा ठसा उमटवला असे देखील म्हणायला हरकत नाही! या मालिकेसोबतच ईशाने ‘मंगलाष्टक वन्स मोर’ ‘याला जीवन ऐसे नाव’ ‘हॅलो नंदन!’ यांसारख्या मराठी सिनेमांमध्ये देखील काम केल आहे. याशिवाय ‘सीआरडी’ या नावाचा हिंदी चित्रपट देखील तिने केला आहे.
ईशाला मोठा ब्रेक मिळाला ज्या वेळेला तिने ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत काम केलं. तसेच ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ यासारख्या प्रसिद्ध एकांकिकेचे नाटकांमधूनही तिच्या अभिनयाची मोहर प्रेक्षकांसमोर उमटली आहे!
View this post on Instagram
इशा केसकर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. कारण इशा तिच्या सोशल मीडियावर फार सक्रिय असलेली दिसते. यावेळी तिने तिथे चक्क एक हॉट अवतारातला बिकिनी मधील फोटो सगळ्यांसोबत शेअर केला आहे!! या फोटोवर तिच्या चाहत्यांच्या लाईक्स आणि कॉमेंटच्याही प्रचंड प्रतिक्रिया मिळताना पाहायला दिसत आहेत.
स्वतःच्या वेगवेगळ्या लुक मधील फोटो आणि व्हिडिओ आपल्या फॅन्स सोबत इशा कायम शेअर करत असते. पारंपारिक आणि गावरान वेशभूषेतील बानूची लाघवी भूमिका साकारणाऱ्या ईशाचा हा बिकिनी अवतारातील फोटो पाहून अनेक चाहत्यांचे होश उडाले आहेत एवढं नक्की!!