दीपिका पदुकोण मुसलमान आहे? पठाण वादादरम्यान ट्विटरवरील हा व्हिडिओ होतोय व्हायरल..

सध्या सर्वत्र पठाण चित्रपटाने जणू हाहाकार माजवला आहे. बॉलीवूड स्टार शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण हे दोघेही त्यांच्या या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यावरून बऱ्याच वादाला सामोरे जात आहेत. बॉलिवूड मधील गेल्या काळात आलेल्या आमिर खानच्या ‘लाल सिंह चढ्ढा’ या चित्रपटानंतर शाहरुख खानच्या विरोधात ‘बॉयकॉट गँग’ सक्रिय झालेली पहायला मिळत आहे. #boycottpathaan हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. दरम्यान, दीपिका पादुकोणविरोधातील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिच्या धर्मावर मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहेत.

पठाण सिनेमाच्या पहिल्या गाण्यात दीपिका खूपच बोल्ड लूकमध्ये दिसली होती. गाण्याच्या एका सिनमध्ये दीपिकाने भगव्या रंगाची मोनोकिनी घातली होती, ज्यावर काही राजकारण्यांनी आक्षेप घेतला आहे. यादरम्यान, पाटणा विद्यापीठात शिकलेल्या एका निवृत्त व्यक्तीचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो दीपिका पादुकोणच्या धर्मावर प्रश्न उपस्थित करताना दिसत आहे.

चित्रपट निर्माते विनोद कापरी यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना, कापरीने कॅप्शन दिले, “#DeepikaPadukone बद्दल नवीन खुलासे असलेला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पाटणा विद्यापीठ तात्काळ बंद केले जावे ”

व्हिडीओतील व्यक्तीची ओळख पटलेली नाही, पण तो दीपिका पादुकोणला मुस्लिम महिला म्हणत आहे. यावर रिपोर्टर त्या व्यक्तीला दीपिका पादुकोणचे वडील प्रकाश पादुकोण यांच्याबद्दल विचारतो, त्यावर तो व्यक्ती त्यांनाही मुसलमान म्हणतो. यावेळी व्हिडिओमध्ये रिपोर्टरसह इतर लोक हसायला लागतात.

सध्या केआरकेने शाहरुख खानच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे. त्याने आपल्या ट्विटमध्ये शाहरुख खानने जे म्हटले की, “शाहरुख खान स्वतःला खरा पठाण असल्याचे सिद्ध करत आहे. शाहरुख म्हणाला:- जर बॉयकॉट गँग असा विचार करत असेल की मी त्यांना घाबरेल, तर ते चुकीचे आहेत. जर माझ्या अभिनय कारकीर्द संपेल, मी स्वयंपाकी बनेन आणि केटरिंग कंपनी ताब्यात घेईन. तर तस होणार नाही आणि मी झुकणार नाही. त्यांच्या या एटीटुडवरच माझे त्यांच्यावर प्रेम आहे.”

शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट हिंदीशिवाय तामिळ आणि तेलगू भाषेतही प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्याशिवाय जॉन अब्राहमही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे.

Leave a Comment

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप