असे आहे रियल लाईफ सिंघम I.P.S विश्वास नांगरे पाटील यांचे गावाकडचे घर..

पोलिस म्हंटले की प्रत्येकांच्या डोळ्यासमोर सिंघम उभा राहतो. पण आज आपण रियल लाईफ सिंघम विषयी जाणून घेणार आहोत. ज्या प्रकारे सिंघम सिनेमात छोट्याशा गावचा बाजीराव स्वतःच्या बळावर आयपी एस अधिकारी बनतो तसाच काहीसा आपला हा मराठमोळा गावाकडचा रियल लाईफ सिंघम आहे. होय, आम्ही बोलत आहोत सध्याचे जॉईंट कमिशनर ऑफ पोलीस विश्वास नांगरे यांच्याबद्दल…

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील कोकरूड या छोट्याशा ग्रामीण भागातून येणाऱ्या तडफदार व्यक्तिमत्त्वाच्या विश्वास पाटील यांनी वयाच्या 25 व्या वर्षीच UPSC ची कठीण परीक्षा पार करून आय पी एस बनले. अर्थात हा प्रवास काही सोपा नव्हता. सतत चढउतार असलेली घरची आर्थिक स्थिती, आणि ग्रामीण भाग त्यामुळे तीव्र संघर्षाच्या खाणीतून विश्वास नावाचा हिरा चकाकला.

संघर्षाच्या वाटेवर सध्या सेवेत असलेल्या भूषण गगराणी यांनी विश्वास नांगरे पाटलांचं आयुष्य बदललं असं ते सांगतात. 1988 साली भूषण गगराणी मराठी साहित्य हा विषय घेऊन आयएएस झाले.

अनेकदा तरुण पिढी त्यांच्या मन मे है विश्वास या आत्मचरित्र वाचून प्रभावित होतात. विश्वास पाटलांचे लक्षवेधक व्यक्तिमत्त्व आणि त्यांची बोल्यण्याची कवितामय शैली यामुळे ते तरुण पिढीचे आवडते पोलीस ऑफिसर आहेत असे म्हणणे गैर ठरणार नाही.

त्यांचे लाखो चाहते असलेले पहायला मिळते. त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी ते नेहमी उत्सुक असतात. सध्या आज त्यांच्या घराबद्दल जाणून घेऊया..

विश्वास नांगरे पाटिल यांचे घर महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील कोकरुड येथे आहे. कौलारू घर आणि जुन्या पद्धतीची बांधणी असे त्यांचे घर सामान्य लोकांप्रमाणेच होते. गावाच्या बाजूने खळखळ वाहणाऱ्या नदीवर मासे पकडणे, आंबा, जांभळाच्या झाडावर चढून त्यांची चव घेणे, गाई म्हैशींना चरायला नेणे, त्यांच्या धारा काढणे हे सर्व त्यांनी लहानपणी अनुभवल्याचं स्पष्ट केले आहे.

“या रान फुलांना जर काळी कसदार जमीन , चांगला खत पाणी मिळाल तर ती अशी रुजतात , अशी उमलतात , अशी फुलतात तर त्यांच्यासमोर मुंबई पुणे सारख्या मोठ्या शहरातील गुलाब, कमळ , मोगरे फिके पडतात. ही कविता एका भाषणात म्हणताना त्यांनी आपल्या गावाकडच्या आठवणींना उजाळा दिला होता.

फक्त पोलिस खात्यासाठी काम न करता त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. त्यांनी भय मुक्त गाव अभियान ही सामाजिक सुरक्षिततेची योजनाही राबवली आहे.यासाठी त्यांचा अनेक स्वयं सेवी संस्थांनी तसेच सामाजिक संघटनांनी पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले आहे.

 

Leave a Comment

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप