IPL 2024 CSK vs RCB: पहिलाच सामना धोनी विरूध्द कोहली, कशी असणार दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

आयपीएलचा गतविजेता संघ चेन्नई सुपर किंग्ज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाविरुद्ध यंदाच्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. आपल्या जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी यंदा आऱसीबीचा संघ मोठ्या ताकदीनिशी उतरणार आहे.  IPL 2024 CSK vs RCB

 

महिला प्रीमियर लीगमधील महिला आरसीबी संघाच्या विजेतेपदातून प्रेरणा घेत शानदार कामगिरी करणार आहे. धोनी आणि कोहलीचे संघ आमनेसामने असल्याने यंदाच्या आयपीएलची सुरूवात एकदम शानदार होणार आहे. दोघेही भारताचे स्टार खेळाडू असून दोघांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने पहिलाच सामना उत्कंठा वाढवणारा आहे.

या दोन्ही संघांनी आयपीएलमध्ये खेळलेल्या ३१ सामन्यांमध्ये, सीएसकेने २० सामने जिंकले आहेत, तर आरसीबी फक्त १० सामने जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. शेवटच्या सामन्यात, आयपीएल २०२३ मध्ये, सीएसकेने चेपॉक येथे आरसीबीचा आठ गडी राखून पराभव केला.

आरसीबीकडे नेहमीप्रमाणेच एक मजबूत फलंदाजी युनिट आहे, परंतु गोलंदाजी बाजू बेंगळुरू संघासाठी कायमच चिंतेचा विषय आहे. प्रामुख्याने योग्य फिरकी गोलंदाज नसल्यामुळे अधिक फरक जाणवतो. कॅमेरॉन ग्रीन हा त्यांच्याकडे ट्रम्प कार्ड आहे. विराट कोहली आणि फॅफ हेच महत्त्वपूर्ण खेळाडू असतील.

चेन्नईचा संघ नेहमीप्रमाणेच परिपूर्ण असा आहे. त्यांची फलंदाजी आणि गोलंदाजी बाजूमध्येही योग्य ताळमेळ आहे. सर्वात मोठा बदल चेन्नईच्या संघात झाला तो म्हणजे धोनीने ऋतुराजकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. धोनीच्या देखरेखीखाली ऋतुराज संघाची कमान सांभाळणार आहे, त्यामुळे त्याच्यासहित संघासाठी दिलासादायक बातमी आहे. न्यूझीलंड संघाचा रचिन रवींद्र आणि डॅरेल मिचेल आणि अनकॅप्ड खेळाडू समीर रिझवी यांच्यावर सर्वांच्या नजरा असतील.

CSK vs RCB पिच रिपोर्ट

चेपॉकमध्ये आतापर्यंत ७६ आयपीएल सामने खेळले आहेत. त्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने त्यापैकी ४६ सामने जिंकले आहेत. जसजशी आयपीएल पुढे सरकत जाईल तसतशी खेळपट्टी जुनी होत जाईल आणि या मैदानावर लक्ष्याचा पाठलाग करणे कठीण होईल. पण सध्या पहिलाच सामना असल्याने लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाला जास्त कठीण परिस्थितीचा सामना करावा लागणार नाही. चेपॉकची खेळपट्टी फिरकीसाठी अनुकूल आहे आणि या मैदानावर ५० ते १८० पर्यंतचा स्कोअर आव्हानात्मक आहे.

CSK vs RCB: संभाव्य प्लेईंग इलेव्हन

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, कॅमेरॉन ग्रीन, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, सुयश प्रभुदेसाई, महिपाल लोमरोर, (यष्टीरक्षक), मयंक डागर, अल्झारी जोसेफ, मोहम्मद सिराज

चेन्नई सुपर किंग्स
रुतुराज गायकवाड(कर्णधार), डेव्हॉन कॉन्वे/रचिन रवींद्र, डॅरेल मिचेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक), दीपक चहर, महिश तीक्षणा, मथीशा पाथीराना/तुषार देशपांडे, शार्दुल ठाकूर

Leave a Comment

Close Visit uttamsheti