करोडोंची संपत्ती असून हि एकदम साधे जीवन जगतात प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज..PHOTO

0

सोशल मीडियावर व्हायरल होणे म्हणजे सेलिब्रिटी होणे हा जणू पायंडा पडला आहे. नाच, गाणी द्वारे तर ते फेमस होतातच पण कॉमेडीच्या जोरावर देखील अनेक लोक फेमस होत असल्याचे चित्र दिसत आहे. असेच फेमस कॉमेडी सेलिब्रिटी म्हणजे महाराष्ट्राचे कीर्तनकार इंदुरिकर महाराज. आपल्या विनोदी वृत्ती व कीर्तन करायची आवड या मधून त्यांनी खूप प्रसिद्धी मिळवली आहे. पण इतकी प्रसिद्धी मिळवून पण ते अत्यंत साध्या पद्धतीने राहतात.. चला तर जाणून घेऊया त्यांच्याबद्दल..

इंदुरीकर महाराज अर्थात निवृत्ती काशिनाथ देशमुख हे महाराष्ट्रातील एक भारतीय कीर्तनकार आणि सामाजिक शिक्षकदेखील आहेत. सर्वसाधारणपणे दररोजच्या छोट्या मोठ्या गोष्टींवरून विनोद करून ते सर्वांना हसवत असतात.. शिवाय त्यामधून समाज प्रबोधन करण्याचा त्यांचा हेतू असतो. यामध्ये सामाजिक आजार आणि गैरव्यवहारांवर व्यंग केलेला असतो..इंदुरीकर महाराज एका कीर्तनाला ५०,००० ते १,००,००० रुपये मागणी करतात. पण त्यांचे राहणीमान साधे आहे.  नेहमीच ते धोतर, बंडी आणि फेटा अशाच वेशात दिसतात.

इंदुरीकर महाराजांच्या या कार्यक्रमात ते कीर्तनाप्रमाणे ताल आणि मृदंग ही वाद्ये वापरून सर्वांचे मनोरंजन देखील करतात.

YouTube Video Statistics for सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज  देशमुख💕निवृत्ती महाराज देशमुख|इंदुरीकर महाराज देशमुख यांचे घर -  NoxInfluencer

इंदुरीकर अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ओझर येथे पत्नी शालिनीताई देशमुख आणि दोन मुलांसह राहतात.इंदुरीकर महाराजांना २ अपत्य आहेत मुलगी ज्ञानेश्वरी आणि मुलगा कृष्णा. ते दोघेही वडीलांप्रमाने कीर्तनकार होण्याच्या मार्गावर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. कीर्तनकार इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनामधून भागवत धर्माचा प्रसार करत आहेत तशाच पद्धतीनेते दोघेही कीर्तनकार होणाच्या मार्गावर आहेत. 

इंदुरीकर महाराज कीर्तनातून कमावतात करोडो रुपये, परंतु राहणीमान एकदम साधं  सरळ Indurikar Maharaj Bio - YouTube

यासोबतच ते ओझर (Bk), संगमनेर येथील ज्ञानेश्वर मौइल बहुउद्देशिया सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.ते गावात एक शाळा चालवतात. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, इंदुरीकर महाराज हे कोणतेही अडाणी व्यक्तिमत्व नसून ते उच्च

शिक्षित आहेत त्यांनी B.Sc B.Ed शिक्षण घेतले आहे व त्यांनी काही दिवस शिक्षक म्हणून सुद्धा काम केलंय. त्यांनी शिक्षक म्हणून काम केल्यानंतर या कीर्तनकार पेशा निवडला आहे. यामुळे सकस बुद्धीच्या जोरावर अनेक मुद्द्यांवर ते कीर्तन करत असतात.

दरम्यान, ते नेहमीच त्यांच्या आक्षेपार्ह विधानामुळे नेट कऱ्यांच्या चर्चेचाच नाही तर मोठ्या हुद्द्यावर असणाऱ्या व्यक्तींच्या नजरेतही येत असतात. त्यांच्यावर अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे.शिक्षक आळशी असल्याचा आरोप करत इंदुरीकरांनी घेतलेल्या स्वाइपबद्दल महाराष्ट्रातील शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती. 

दरम्यान, इतिहासकार तसेच कीर्तनकार सदानंद मोरे यांच्या मते इंदुरीकर संत परंपरा आणि वारकरी संप्रदायाच्या उतरंडीत बसत नाहीत..

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप