भारताला धक्यावर धक्के! कसोटी पराभवानंतर आयसीसीची बुमराहवर मोठी कारवाई, वेगवन गोलंदाजाने काय केलं एकदा वाचाच India’s shock after shock

India’s shock after shock हैदराबाद कसोटीत झालेल्या पराभव भारताच्या जिव्हारी लागला आहे. या पराभवातून भारतीय संघ सावरत अशतानाच अजून एक धक्का संघाला बसला. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या सामन्यात सहा विकेट्स घेतल्या आणि महत्वाची जबाबदारी पार पाडली. असे असले तरी, सोमवारी (29 जानेवारी) आयसीसीकडून बुमराहवर मोठी कारवाई केली गेली.

 

हैरदाबाद कसोटी गमावल्यानंतर एका दिवसात जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्याबाबत मोठी बामती समोर येत आहे. वेगवान गोलंदाजाला एकप्रकारे आयसीसीकडून चेतावणीच मिळाली आहे. बुमराहने कसोटी सामन्याच्या तिसऱ्या डावात आयसीसी आचार संहितेचे उल्लंघन केले आहे. त्याने आचार संहितेतील लेवल एकचे उल्लंघन केल्याचे मान्य केले आहे. यासाठी त्याला आयसीसीकडून एक डेमिरिट पाँइंट देखील दिला गेला.

आयसीसीच्या आचार संहितेतील अनुच्छेत 2.12चे उल्लंघन त्याच्याकडून झाले आहे. यानंतर आंतरराष्ट्रीय खेळाडू, सपोर्ट स्टाफ, पंच, मॅच रेफरी यांच्याशी एखादा खेळाडू गैरवर्तन करत असेल, तर त्याच्यावर कारवाई केली जाते. बुमरहाने इंगलंडच्या दुसऱ्या डावातील 81 व्या षटकात बुमराह आणि ओली पोप यांच्यातील संघर्ष पाहायला मिळाला होता. पोप आणि बुमराह खेळपट्टीवर एकमेकांना धडकल्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वाद झाली होती. पंचांनी हे लक्षात घेऊन भारतीय गोलंदाजाला एक डेमिरिट पाँइंट दिला आहे.

आयसीसी नियमांनुसार एका खेळाडूला 24 महिन्यांच्या कालावधीमध्ये 4 किंवा त्यापेक्षा अधिक डेमिरिट पाँइंट मिळाले, तर त्या खेळाडूवर बंदी घातली जाऊ शकते. जर एखाद्या खेळाडूला 24 महिन्यांमध्ये 2 डेमिरिट पाँइंट्स मिळाले एक कसोटी किंवा वनडे-टी-20 फॉरमॅटमध्ये दोन सामन्यांमधून बाहेर बसवले जाते. (Jasprit Bumrah gets one demerit point from ICC)

Leave a Comment

Close Visit uttamsheti