सुपरहीट कांतारा सिनेमात ऋषभ नाहीतर हा अभिनेता साकारणार होता शिवा.. खुद्द ऋषभने केला खुलासा..

0

सध्या सर्वत्र बहुचर्चित असलेला बँग ऑन सिनेमा म्हणजे ‘कांतारा’. श्रद्धा की अंधश्रद्धा म्हणत या चित्रपटाने आज अनेकांना हा चित्रपट पाहण्यास भाग पाडले आहे. मुळात कन्नड भाषेत असणारा हा चित्रपट आता अनेक भाषांमध्ये अगदी आवडीने पहिला जातो. केजी एफ सिनेमानंतर कांतारा सिनेमाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये पहायला मिळत आहे.

अनेक वाद विवाद, काँट्रोव्हर्सी च्या भोवऱ्यात अडकली असला तरी हा चित्रपट आज एक महिन्यांनंतर ही सिनेमागृहांमध्ये आतापर्यंत या सिनेमाने जवळपास 200 कोटींचा टप्पा पार करत बॉक्स ऑफिस वर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. आणि विशेष म्हणजे चित्रपटाचा नायक शिवा अर्थात अभिनेता ऋषभ शेट्टी त्याच्या जबरदस्त अभिनयामुळे अलीकडे तुफान चर्चेचा विषय बनला आहे. पण त्याच्याशी निगडीत एक चटपटीत खबर समोर आली आहे. काय आहे ही खबर चला जाणून घेऊया.

‘कांतारा’ या सिनेमाचे दिग्दर्शन ऋषभ शेट्टीनेच केलं आहे. शिवाय तो सिनेमात प्रमुख भूमिकेतही दिसून आला आहे. या चित्रपटतील ऋषभच्या अभिनयाचं कौतुक सर्वत्र ऐकायला मिळत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? चित्रपटात शिवा चे पात्र ऋषभ नाहीतर सर्वांचा लाडका अप्पू राजा म्हणजे अभिनेता पूनित राजकुमार साकारणार होते. होय, एका मुलाखती दरम्यान ऋषभ म्हणाला की, शिवाची भूमिका दिवंगत अभिनेता पुनीत राजकुमार साकारणार होते.

या मुलाखतीत ऋषभ म्हणाला, ‘मला शिवा ही भूमिका साकारायची होती पण या चित्रपटाची निर्मिती करण्याआधी मी या भूमिकेची ऑफर अभिनेता पुनीत राजकुमार यांना दिली होती. त्यांना मी चित्रपटाची कथा देखील ऐकवली होती. पण ते दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्याने त्यांनी मला सांगितले की, हा चित्रपट तुम्ही माझ्याशिवाय करा कारण माझी वाट तुम्ही पाहिली तर यावर्षी तुम्ही हा चित्रपट करु शकणार नाही.’

पुढे तो म्हणाला, ‘पुनीत राजकुमार यांचे निधन होण्याच्या दोन दिवस आधी ‘बजरंगी 2′ चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंटमध्ये ते मला भेटले होते. यावेळी त्यांनी मला कांताराबद्दल विचारले, आणि मी त्यांना शूटचे काही फोटोही दाखवले, त्यांनी कौतुकही केलं. शिवाय त्यांना हा चित्रपट पहायचाच होता.’ पण त्या पुनीत यांचे निधन झाले. याबाबत ऋषभ ने दुःखही व्यक्त केले. शिवाय सिनेमा इतका सुपर हिट झाला याबाबत त्याने अनेक किस्से देखील शेयर केले. जे प्रेक्षकांनी खूप एन्जॉय केले.

Leave A Reply

Your email address will not be published.