प्राजक्ता माळीच्या कुटुंबात झाली लगीन घाई, प्राजक्ता माळीच्या संपूर्ण कुटुंबाचा फोटो आला समोर..
महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री म्हणून प्राजू artha प्राजक्ता माळी. तिने अल्पावधीतच चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. ती तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून आपल्या चाहत्यांना अपडेट देत असते.
अभिनेत्री प्राजक्ता माळी कामामधून वेळ काढत आपल्या कुटुंबाला वेळ देताना दिसते. कुटुंबाबरोबर मनसोक्त फिरणं असो वा एखादा घरगुती कार्यक्रम ती आवर्जुन हजेरी लावते. यादरम्यानचे बरेच फोटो व व्हिडीओही ती तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसते.
View this post on Instagram
आताही प्राजक्ता तिच्या भावाच्या लग्नाला पोहोचली आहे. या लग्नासोहळ्याचे बरेच फोटो व व्हिडीओही प्राजक्ताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत. भावाच्या लग्नासाठी प्राजक्ताने खास नऊवारी साडी नेसली केली. इतकंच काय तर या साडीवर तिने परिधान केलेले दागिने कोल्हापूरहून खरेदी केली. प्राजक्ताने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे खास फोटो शेअर करत घरातील नव्या सदस्याचं स्वागत केलं आहे.
तिने कुटुंबासह फोटो शेअर करत म्हटलं की, “घरचं लग्न. गोतवळा जमल्यावर बरं वाटतं. नव्या पाहुणीचं कुटुंबात स्वागत आहे.” तसेच तिने ही पोस्ट शेअर करत तुम्ही लग्न कधी करताय? हे विचारू नका अशी गोड विनंती केली आहे.
प्राजक्ताच्या भावाचं नाव अभिषेक तर वहिनीचं नाव सायली आहे. सध्या ती कुटुंबाबरोबर घरातलं लग्न एण्जॉय करताना दिसत आहे. भावाच्या लग्नात प्राजक्ताच अगदी उठून दिसत होती हे फोटो व व्हिडीओमधून स्पष्ट होत आहे. प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोंवर अनेकांनी कमेंट करत तिच्या लूकचं कौतुक केलं आहे.
View this post on Instagram
दरम्यान, प्राजक्ता सोशल मीडियावर नेहमी तिच्या लाडक्या भाचीचे फोटोज् शेयर करत असते पण खास दिवाळीनिमित्त तिने आपल्या पूर्ण कुटुंबाचा फोटो शेयर केला होता. या फोटोत तिचे आई-बाबा, दादा वहिनी आणि तिच्या दोन भाच्या पाहायला मिळत आहे. तिने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “दिवाळीनिमित्ताने अनिवार्य पोस्ट.” तिच्या या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळाली.
प्राजक्ताच्या या फोटोंवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. यापूर्वीही प्राजक्ताने कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांनाही चाहत्यांची पसंती मिळताना दिसते. प्राजक्ता अलीकडेच तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंग साठी लंडन ला गेली होती. तिने याआधी लकडाउन चित्रपटात अंकुश चौधरीसोबत उठावदार अशी भूमिका साकारली होती. सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात ती उत्तम सूत्रसंचालन करते आहे.