Year Ender 2022 : सरत्या वर्षात या दिग्गज कलाकारांची मालवली प्राणज्योत.. निधनाने मनोरंजनसृष्टी झाली पोरकी

0

२०२२ हे साल कोणासाठी चांगलं तर कोणासाठी वाईट ठरलं. पण हे साल बॉलीवूडसाठी खूपच अनलकी ठरलं आहे. या वर्षी बॉलीवूड मधील दिग्गज कलाकारांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला. त्यामुळे बॉलीवुडमधील कलाकारच नाही तर भारतात राहणारा प्रत्येक चाहता हळहळला. आकाशातून जसे तारे निखळून पडावेत तसे बॉलीवूड मधील दिग्गज कलाकार या जगातून निसटून गेले. कोण आहेत हे दिग्गज कलाकार जाणून घ्या आजच्या या लेखात..

पंडित बिरजू महाराज
बॉलीवूड मध्ये अनेक अभिनेत्रींना आपल्या शृंगारिक पद्धतीने कोरीओग्राफ करणारे सुप्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचं यावर्षी १७ जानेवारी २०२२ रोजी निधन झालं. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना १९८३ मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.

लता मंगेशकर
भारताची गानकोकिळा,गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी ६ फेब्रुवारी २०२२ रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. लतादीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी मुंबईच्या शिवाजी पार्कवर करोडो चाहत्यांनी गर्दी केली होती..

रमेश देव
मराठी तसेच हिंदी सिनेमासृष्टीतील दिग्गज अभिनेते रमेश देव यांचे २ फेब्रुवारी २०२२ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. कित्येक दशकं त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.

बप्पी लहरी
ज्येष्ठ संगीतकार बप्पी लहिरी यांचे १५ फेब्रुवारी २०२२ रोजी निधन झाले. हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या हटके संगीताने बप्पी लहिरी यांनी विशेष ओळख निर्माण केली.

पंडित शिवकुमार शर्मा
प्रसिद्ध संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांनी १० मे २०२२ रोजी वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

प्रदीप पटवर्धन
चित्रपट आणि नाट्यसृष्टीत नाव गाजवलेले प्रदीप पटवर्धन यांच्या निधनाच्या बातमीने मनोरंजनसृष्टीला अनपेक्षित धक्का बसला. ९ ऑगस्ट २०२२ रोजी मराठी प्रदीप पटवर्धन यांच्या निधन झाल्याचं कळून आले. वयाच्या ६५ व्या वर्षी राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

केके
Voice of Love म्हणून प्रख्यात असणारे प्रसिद्ध गायक केके यांचे ३१ मे २०२२ रोजी हार्ट अटॅक मुळे निधन झाले. कोलकातामध्ये एका काँसर्ट दरम्यान त्यांची अचानक तब्येत बिघडली आणि त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथेच त्यांना मृत म्हणून डॉक्टरांनी घोषित केलं गेलं. वयाच्या ५३ व्या वर्षी केके यांनी अखेरचा श्वास घेतला.

विक्रम गोखले
मराठी आणि हिंदी सिनेमा सृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने आपली जागा राखून असणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे २६ नोव्हेंबर २०२२ रोजी निधन झाले. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सुलोचना चव्हाण
लावणीसम्राज्ञी आणि ज्येष्ठ पार्श्‍वगायिका सुलोचना चव्हाण यांचं १० डिसेंबर २०२२ रोजी निधन झालं. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.