आज आम्ही तुम्हाला पोटाची चरबी कमी करण्यासाठी काही पेयांबद्दल सांगणार आहोत.
१. रिकाम्या पोटी या डिंकचे सेवन केल्यास पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते.
२. ग्रीन टी- पोटाची चरबी कमी करायची असेल तर ग्रीन टी हा उत्तम पर्याय आहे. वजन कमी करण्यासाठी हे अतिशय प्रभावी पेय मानले जाते. तुम्ही ते सकाळी रिकाम्या पोटी पिऊ शकता.
३. मध-लिंबू पाणी- मध आणि लिंबू पाणी पिणे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. तुम्हाला फक्त एक ग्लास कोमट पाण्यात थोडासा लिंबाचा रस आणि एक चमचा मध मिसळून प्यावे लागेल.
४. बडीशेप पाणी- सकाळी लवकर बडीशेपचे पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. म्हणूनच हे पेय तुम्ही सकाळी पिऊ शकता.
५. लिंबू आणि पुदिन्याचे पाणी:हवामानानुसार हिवाळ्यात कोमट पाणी घ्यावे लागते. कोमट पाण्यात संपूर्ण लिंबू पिळून त्यात पुदिन्याची पाने टाका. हे पेय दोन महिने रिकाम्या पोटी सेवन केल्यास वजन कमी होऊ शकते.
६. गाजर आणि बीटरूटचा रस: गाजर आणि बीटरूटचा रस केवळ आरोग्यासाठीच फायदेशीर नाही तर वजन कमी करण्यासही मदत करतो. गाजर आणि बीटरूट धुवून मिक्स करावे. या रसाच्या सेवनाने वजन तर कमी होतेच पण त्याचबरोबर त्वचेवर नैसर्गिक चमकही येते.
७. नारळ पाणी नारळाचे पाणी: फक्त त्वचेसाठीच नाही तर वजन कमी करण्यासाठी देखील सर्वोत्तम मानले जाते. नारळपाणी प्यायल्याने तुमची पचनक्रियाही सुधारते. आवळा ज्यूस आवळा ज्यूस वजन कमी करणे आणि चमकदार त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे.
८. आवळा: आवळ्याच्या रसात चिमूटभर काळी मिरी टाकूनही सेवन करू शकता. आवळ्याच्या रसात पाणी मिसळून प्या.