मित्रहो महाराष्ट्रातील राजकीय वातावरण प्रचंड खळबळ जनक झाले आहे. या वातावरण अनेक घडामोडी लक्षवेधी ठरत आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले असल्याने शिवसेना आता उताराला आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शिवसेनेला सत्तेतून पाय उतार व्हावे लागते की काय असा अनेकांना प्रश्न पडत आहे. शिवाय एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेल्या आमदारांची संख्या देखील जास्त आहे, त्यामुळे शिवसेना नक्कीच धोक्यात आली आहे. आता खुप जणांनी यावर चर्चा करायला सुरुवात केली असून सर्वत्र राजकीय बातम्या लोकांच्यात खळबळ उडवून टाकत आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या सोबत भरपूर आमदार उभे आहेत, तर दुसरीकडे शिवसेने कडे काहीच आमदार सोबत आहेत. शिवसेनेची स्थिती सध्या बिकट झाली आहे, दरम्यान खुपजनांना असे वाटते की यावेळी राज ठाकरे जर उद्धव ठाकरे यांच्या सोबत असते तर पक्ष सुरक्षित राहिला असता शिवाय उद्धव ठाकरे यांना मोठा आधार देखील मिळाला असता. तसेच जर राज ठाकरे पाठीशी उभे असते तर परिस्थिती इतकी जास्त हाताबाहेर अजिबात गेली नसती. त्यांनी शिवसेनेतले हे बंड देखील मोडून टाकले असते.
दरम्यान या बाबतीत मराठी वृत्तपत्रासोबत बोलताना राजकीय विश्लेषक अमिताभ तिवारी यांनी सांगितले की “बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची सूत्र उद्धव ठाकरे यांच्या हाती सोपवली. तेव्हा देखील राज ठाकरे हेच शिवसेनेचे प्रमुख असावे अशी पक्षातील अनेकांची इच्छा होती. २००६ साली राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून मनसेची स्थापना केली. राज हे शिवसेनेत असते तर त्यांनी उद्धव यांना या पेचप्रसंगातून बाहेर काढले असते.”
अनेक आमदारांचे, कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना मदत केली असती. यावेळी त्यांनी पक्ष व्यवस्थित सांभाळला असता. शिवसेना सध्या पडत्या दगडावर उभी आहे त्यामुळे तिचा तोल कोणत्या बाजूला जातो हे पाहण्यासाठी अनेकांच्या नजरा उत्सुकाने भरल्या आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे हे देखील सर्वत्र चर्चेत येत आहेत, ठाण्यात त्यांच्या नावाचा दबदबा वाढला आहे. सोशल मीडियावर सुद्धा त्यांची अनेकजण चर्चा करत आहेत. महाराष्ट्राचा प्रत्येक कोपरा, एकनाथ शिंदे हेच नाव ऐकत आहे.
राजकीय वातावरण तापलेले आहे, मनसे आणि शिवसेना यांच्यातील वाढत असलेला हा रस्ता आता कोणते वळण घेईल याची कोणालाच खबर नाही. मित्रहो तुमची यावर काय कमेन्ट आहे ते आम्हाला नक्की सांगा, तुम्हाला शिवसेने बद्दल काय वाटते किंवा या राजकीय घडामोडी कोणते नवीन वळण घेत आहेत याबद्दल देखील नक्की सांगा. जर आजचा हा लेख आवडला असेल तर लाईक आणि शेअर देखील नक्की करा.