‘वडिलांना घाबरत नाही, तितकं अशोक पप्पांना…’,सायलीनं अशोक सराफांसोबतच्या नात्याबद्दल केला खुलासा

0

रुपेरी पडद्यावर आपण कलाकारांना अनेक नाती निभावताना पाहत असतो. जी नकली असली तरीही त्यात जिवंतपणा आणून खोटी नातीही खरी करण्यात कलाकार तरबेज असतात. ते ही नाती जितकी रिल लाईफ मध्ये जगत असतात तितकीच रियल लाईफ मध्ये जगत असतात का? हा सर्वांना पडणारा कॉमन प्रश्न आहे. पण याचे उत्तर काहीवेळा होय असेच मिळते. असच काहीस घडले आहे आपल्या लाडक्या सायली संजीव सोबत.. काय सांगतेय ती आपल्या रियल लाईफ नात्यांबद्दल जाणून घ्या..

आपल्या सर्वांना माहीत आहे की अभिनेत्री सायली संजीव ही सध्या मराठी सिनेमासृष्टीतील उभरती कलाकार आहे… पण जर तुम्हाला कुणी सांगितलं की सायली ही अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची मुलगी आहे तर तुम्हाला हे खरे वाटेल का? पण अनेकांना हे खरं वाटते. पण या मागचं गुपित तुम्हाला ठाऊक आहे का?

सायली अशोकमामांची मुलगी नसली तरीही सायली आणि अशोकमामांचं नातं बापलेकीसारखच आहे खूप खास आहे. नुकतंच लोकमत फिल्मीच्या पंचायत या शोमध्ये सायलीने तिचं अशोकमामांचं नातं कसं आहे आणि बरेचशे लोकं तिला त्यांची मुलगी का म्हणतात याबाबत सांगितले आहे.

सायली म्हणाली, बाबा फक्त संजीव आहेत. अशोक सराफ सर, स्वतः म्हणाले की तू आता मला काय म्हणशील?. तू आता मला पप्पा म्हण. तर मी त्यांना अशोक पप्पा म्हणते. सेटवर किंवा टेलिव्हिजनवर एकत्र असू तेव्हा मी त्यांना सर म्हणण्याला प्राधान्य देते. कारण ते खूप दिग्गज कलाकार आहेत आणि आपण त्यांना तो मान दिला पाहिजे.

मला ते काहे दिया परदेस पासून ते बघायला लागले. त्या आधी आमची काही ओळख नव्हती. जेव्हा मालिकेचे प्रोमो रिलीज झाला तेव्हा बरेच जण बोलू लागले की ही निवेदिता सराफ यांची कॉपी आहे. त्या कमेंट्समध्ये निवेदिता सराफ यांची मुलगी आहे का? अशोक सराफ दररोज मालिका न चुकता पाहायचे. त्यांच्या एका चित्रपटाच्या म्युझिक लाँचला मी गेले होते. तेव्हा त्यांनी माझ्या एका मित्राला तिला घेऊन ये असं सांगितलं. तो त्या सिनेमात काम करत होता. तिथे आमची पहिली भेट झाली. तेव्हा पासून मुलीचं आणि बापाचं नातं सुरू झालंं.

माझ्या वडिलांचे वर्षभरापूर्वी निधन झाले आणि चार वर्षांपासून मी अशोक पप्पांना ओळखते. अशोक सर मला मुलगी मानतो. त्यांचा मुलगा अनिकेत याबद्दल त्यांना फारशी माहिती नसते. पण त्यांना माझी प्रत्येक अपडेट माहित असते. ते माझी एकही मुलाखत चुकवत नाहीत. मी जितकी माझ्या वडिलांना घाबरत नव्हते. तितकी अशोक पप्पांना घाबरते, असे सायलीने सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप