बॉलिवूडमध्ये होणार आणखी एक लग्नसोहळा? ऋतिक करणार १२ वर्षांनी लहान असलेल्या गर्लफ्रेंडसोबत लग्न!

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या लग्नानंतर बॉलिवूडमध्ये आणखी एका लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. ती म्हणजे बॉलिवूडचा हँडसम हंक ऋतिक रोशन आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद!!

 

बॉलीवूड मधील सगळ्यात स्टायलिश आणि फिट अभिनेता म्हणून ऋतिक रोशनला ओळखण्यात येते. ऋतिक कायमच त्याच्या स्टाईल आणि हटके लूक मुळे चर्चेत असतो. पण यावेळी मात्र तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. ते म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून ऋतिक अभिनेत्री सबा आझाद हिला डेट करत असल्याची चर्चा बॉलीवूडमध्ये रंगली आहे.

ऋतिक-सबा बॉलिवूडच्या सध्या ‘हॉटेस्ट कपल’ पैकी एक म्हणून ओळखले जातात. अलीकडेच त्यांचे परदेशात सुट्टी एंजॉय करताना फोटो व्हायरल झाले होते. सोशल मीडियावर त्यांच्या रिलेशनशिपची विशेष चर्चा असते. दरम्यान काही महिन्यांपूर्वी हृतिकचा त्याची पत्नी सुझेन हिच्याशी घटस्फोट झाला, त्यांचं १४ वर्षांच्या नातं संपल्याने अनेकांना धक्का बसला होता. आता हृतिक त्याच्यापेक्षा १२ वर्षांनी लहान असणाऱ्या सबा आझादला डेट करतो आहे.

ऋतिक आणि सबा गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्याबद्दल खूपच उघडपणे बोलत असताना पाहण्यात आलंय! या दोघांच्या बाबतीत बातम्या देखील नेहमीच येत राहतात. मीडियामध्ये येत असलेल्या बातम्यांमधून सबा आणि ऋतिक लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वी परदेशात ते दोघे त्यांच्या सुट्ट्या सुद्धा एन्जॉय करताना दिसले. त्याचे अधिकृत फोटोही सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. म्हणूनच आता ऋतिक आणि सबाच्या चाहत्यांना हे दोघं लग्न कधी करणार? असा प्रश्न पडला आहे.

परंतु यांच्या नात्याबद्दल सध्या चर्चा जरी होत असली तरी, ऋतिक रोशन आणि सबा हे दोघेही लग्न बंधनात केव्हा अडकणार याबाबतची अजून कोणतीच अधिकृत माहिती मीडिया समोर आलेली नाही. परंतु माध्यमांमधून जी माहिती सगळ्यांसमोर येत आहे त्यात असं म्हणण्यात आल आहे की, ऋतिक आणि सबा लवकरच लग्न करणार आहेत याबाबत फिल्म फेअरने नुकतीच एक पोस्ट शेअर केली, त्यात ऋतिक लवकरच सबा सोबत लग्न करू शकतो असं लिहिल आहे! म्हणूनच मीडियामध्ये ही बातमी वेगाने पसरली आहे. याच संदर्भात अस्ट्रॉलॉजर बेजान दारूवाला यांनी देखील आता ऋतिक आणि सबा यांचा विवाह होण्याची शक्यता वर्तवली होती!

ऋतिक आणि सबा यांच्या बद्दल पहिल्यांदा ते दोघे मुंबईतील एका रेस्टॉरंट मधून बाहेर पडताना स्पॉट झाले होते, तेव्हापासून ते दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवांना मीडियावर जोर आलेला. त्यानंतर बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्माता करण जोहरच्या बर्थडे पार्टीमध्ये सुद्धा सबा आणि ऋतिक यांना एकत्रित फोटोसाठी पोज देताना क्लिक करण्यात आले होते.

Leave a Comment

Close Visit uttamsheti