कलरफुल म्हणत हृता पोहोचली थायलंड मध्ये, फोटोज् झाले व्हायरल..

महाराष्ट्राची क्रश म्हणून नावारूपाला आलेली हृता सध्या सर्वत्र लोकप्रिय ठरली आहे. आपल्या निरागस सौंदर्य आणि अजोड असा अभिनय यांच्या जोरावर ती आज घराघरात पोहोचली आहे. दरम्यान, मन उडू उडू झाले या मालिकेमुळे चाहत्यांची लाडकी बनली. दरम्यान तिच्या वाढदिवसानिमित्त ती तिच्या पतीसोबत थायलंड ला गेली होती. तेथील अत्यंत सुंदर फोटोज् सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hruta Durgule (@hruta12)

थायलंडमधील फुकेट या सुंदर शहरात हृताने तिचा वाढदिवस साजरा केला. यानंतर ती फी फी बेटावर गेली होती. हृता व प्रतीकचं याचवर्षी 18 मे रोजी लग्न झालं. आता पुन्हा एकदा हे जोडपं एकमेकांसोबत क्वालिटी टाईम घालवतंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hruta Durgule (@hruta12)

दरम्यान, प्रतिकने ह्रताच्या वाढदिवशी पती सोशल मीडियावर तिच्यासाठी अत्यंत एक खास पोस्ट शेअर केली होती. आपल्या क्यूट फोटोज् सह कॅप्शन लिहिले की, “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय. जसजसे आपण एक वर्ष मोठे होतो तसे अधिक जबाबदार होतो !! तुला आयुष्यातील सर्व सुख आणि यश मिळू देत. अशा शब्दांत प्रतिकने ह्रताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.”

दरम्यान, हृता आणि प्रतिकने कुटुंबाच्या संमतीने आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये १८ मे २०२२ रोजी लग्नगाठ बांधली. हृताच्या लग्नामुळे चाहत्यांना भलताच आनंद झाला होता. परंतु, सगळ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. २४ डिसेंबर २०२१ रोजी या दोघांनी साखरपुडा केला होता.

हृताचे अलीकडे दोन दमदार सिनेमे मोठ्या पडद्यावर आले. आधी ‘अनन्या’ आणि यानंतर ‘टाइमपास ३’ या चित्रपटात ती झळकली. आता तिचे आणखी दोन प्रोजेक्ट येत्या काळात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. वाढदिवशीच हृताने ‘कन्नी’ या सिनेमाची घोषणाही केली आहे. याशिवाय महेश मांजरेकरांच्य ‘एका काळेचे मणी’ या वेब सीरिजमध्येही ती झळकणार असल्याच्या बातम्या समोर येतआहे.

हृताने छोट्या पडद्यावर दुर्वा या मालिकेतून पदार्पण केले. त्यानंतर तिला खरी लोकप्रियता मिळाली ती ‘फुलपाखरू’ या मालिकेतून. ‘मन उडू उडू झालं’ ही तिची मालिका प्रचंड गाजली.

हृताचा नवरा प्रतीकने बेहद 2, कुछ रंग प्यार के ऐसे भी, तेरी मेरी एक जिंदडी, तेरी मेरी एक जिंदडी, इक दिवाना था या मालिकांचे दिग्दर्शन केलं आहे. प्रतिकची आई आणि हृताच्या सासूबाई मुग्धा शाह या सुद्धा लोकप्रिय अभिनेत्री आहेत. मुग्धा शाह यांनी अनेक हिंदी मराठी मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे. बे दुणे साडे चार, मिस मॅच, माहेर माझं हे पंढरपूर, ‘संभव असंभव सारख्या चित्रपटात त्या झळकल्या आहेत.

Leave a Comment

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप