बिग बॉस शोची किती पहावी लागणार वाट? या कारणामुळे तारीख गेली पुढे..
छोटया पडद्यावरील वरील सर्वात गाजणारा वादग्रस्त शो म्हणजे बिग बॉस.. भांडण, वाद, टास्क आणि शाळा यांनी भरपूर असा हा रियालिटी शो टिव्हीवर जरी थोड्याच काळासाठी येत असला तरी चाहत्यांच्या मनात कायमचं स्थान देखील मिळवून आहे. गेल्या काही वेळापासून बिग बॉस ४ च्या टिव्हीवर येण्याच्या बातम्यांनी जोर धरला होता. इतकंच काय तर या शोचा होस्ट कोण असणार यावर आणीबाणी ची व्हावी अशी गहन चर्चा देखील झाली. दरम्यान, सिद्धार्थ जाधवच नाव होस्ट म्हणून समोर येत होत. पण अखेर बाप बाप होता है म्हणत महेश मांजरेकर च या शोची धुरा सांभाळणार आहेत. पण तरीही इतक्या दिवसांपासुन प्रेक्षक या शोची आतुरतेने वाट पाहत असताना अजून किती वाट पाहावी लागेल असे प्रश्न उद्धवत आहेत.
दरम्यान, स्पर्धकांच्या चढाओढीसोबतच मांजरेकरांच्या स्वॅग आणि अप्रतिम होस्टिंग कौशल्याने चाहत्यांना अनोखा आनंद दिला आहे. उल्लेखनीय म्हणजे, बिग बॉस मराठीच्या मागील तीन सीझनला लोकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता.
View this post on Instagram
त्यामुळे, बिग बॉस मराठी सीझन 4 मोठ्या प्रमाणावर लाँच करण्यासाठी निर्माते कोणतीही कसर सोडू इच्छित नाहीत. यापूर्वी, महेश मांजरेकर शो सप्टेंबर 2022 च्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होईल असे अहवाल समोर येत होते.तथापि, एका ताज्या अहवालात असे सूचित करण्यात आले आहे की सध्या सुरू असलेल्या गणपती उत्सवामुळे शो पुढे ढकलला जाऊ शकतो.
जवळच्या स्त्रोतानुसार माहिती दिली की बिग बॉस मराठी ४ ११ सप्टेंबर रोजी लॉन्च होणार होता, परंतु काही कारणांमुळे, निर्मात्यांनी ते पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागील कारण सांगताना, सूत्राने पुढे सांगितले की, गणपती उत्सवादरम्यान कलाकारांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे बिग बॉस मराठी सिझन ४ ची लाँच तारीख पुढे ढकलली जाऊ शकते.
याचे कारण हे की, या शोची सगळी तयारी झाली असली तरी सगळीकडे गणेशोत्सवाचा माहोल आहे, त्यामुळेच या सीझनला उशीर होत आहे. काही कलाकरांना विचारणा करण्यात आली आहे, मात्र अद्याप त्यांनी आपले निर्णय कळवलेले नाहीत. तर काही सहभागी होणाऱ्या कलाकारांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे देखील या सीझनला उशीर होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हे पर्व ऑक्टोबरमध्ये सुरू होईल असा अंदाज बांधला जात आहे.
निर्मात्यांनी अद्याप या सीझनसाठी स्पर्धकांना अंतिम यादी ठरवली दिलेले नाही. बिग बॉस मराठी ४ च्या स्पर्धकांची अधिकृत यादी अद्याप समोर आलेली नाही. आता सध्या बाप्पा घरी आल्यामुळे बिग बॉस च्या घरी लाडके स्पर्धक थोडे उशिरा येणार आहेत त्यामुळे त्यांची आणि शोची थोडीशी वाट पहावी लागणार आहे.