एकेकाळी राखी बांधणारी श्रीदेवी कशी बनली बोनी कपुर यांच्या हृदयाची राणी? अगदीच हटके आहे श्रीदेवी आणि बोनी कपूर प्रेमकहाणी..

बॉलीवूड मधील सदाबहार आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून श्री देवी आजही लोकप्रिय आहे. अनेक लोकांच्या मनात घर केलेली श्री देवी मात्र बोनी कपूर यांच्या नशिबात लिहिली होती. पण त्यांची हटके लव्हस्टोरी ऐकून तुम्हाला ४४० वॉल्टचा झटका लागल्यावाचून राहणार नाही. चला तर जाणून घेऊया कशी बनली हवा हवाई बोनी कपूर यांच्या हृदयाची राणी.

तर गोष्ट आहे ९० च्या दशकाची.. त्या काळी श्री देवी प्रसिद्धीचे शिखर चढत होती. अनेक डायरेक्टर्स श्री देवीच्या डेट्स घेण्यासाठी लाईन मध्ये होते आणि त्यावेळी बोनी कपूर यांनादेखील श्रीदेवीसोबत चित्रपट करण्याची इच्छा होती. त्यासाठी श्रीदेवीच्या डेट्स घेण्यासाठी चेन्नईला पोहोचले. स्टोरी मध्ये ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा खुद्द श्रीदेवी बोनी कपूरना भेटली.

श्रीदेवी यांना त्यांच्या घरी पहिल्यांदा भेटल्यावर बोनी यांना धक्का बसला. कारण, श्रीदेवी या घरात अगदी साधारण कॉलेज तरुणी प्रमाणे सध्या राहत होत्या. श्रीदेवीचे साधेपणा बोनी यांना इतका आवडला की, त्यानी भाऊ अनिल कपूरला फोन करून मी तुझ्या आणि श्रीदेवीसोबत एक चित्रपट करत आहे. त्यावेळी ते ‘गोविंदा’ नावाचा चित्रपट बनवणार होते. मात्र, काही कारणास्तव हा चित्रपट तयार झाला नाही.

त्यानंतर त्यानी ‘मिस्टर इंडिया’ हा चित्रपटाची निर्मिती झाली. या चित्रपटात अभिनेते अनिल कपूर आणि श्रीदेवी यांनी जबरदस्त भूमिका साकारली होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.मिस्टर इंडिया या चित्रपटाच्या सेटवरच बोनी कपूर श्रीदेवीच्या प्रेमात पडले. दरम्यान, एक दिवस डिनरनंतर बोनी यांनी श्रीदेवीला प्रपोज केले. यामुळे श्रीदेवी यांना राग आला आणि त्या रडायला लागल्या. त्या गाडीतून खाली उतरल्या आणि निघून गेल्या. त्यांनतर नऊ महिने श्रीदेवी बोनी कपूर यांच्याशी बोलल्या नव्हत्या. त्यानंतर अखेर चार वर्षांनी श्रीदेवी यांनी बोनी कपूर यांना प्रेमासाठी होकार दिला. तेव्हा बोनी कपूर हे विवाहित होते.

श्रीदेवी यांनी ८० आणि ९० च्या दशकात बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. बोनी कपूर यांची पहिली पत्नी मोना कपूर आणि श्रीदेवी यांची मैत्री होती. त्यामुळे त्यांनी श्रीदेवीला त्यांच्या घरात राहायला जागा दिली होती. दरम्यान, श्रीदेवी या अभिनेते मिथुन चक्रवर्तीला डेट करत होत्या.

मात्र, याच दरम्यान श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्यात जवळीक वाढत असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या. यामुळे मिथुन आणि श्रीदेवी यांच्यात खटके उडायला सुरुवात झाली. त्यामुळे मिथुनला प्रेमाची खात्री देण्यासाठी, श्रीदेवी यांनी बोनी कपूर यांना राखी बांधली होती. जेणेकरून श्रीदेवी आणि बोनी यांच्यात काहीही सुरु नाही याची मिथुनला खात्री होईल. पण अचानक बोनी कपूर आणि श्रीदेवी यांच्या या नात्याचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघे विवाहबंधनात अडकले.

 

Leave a Comment

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप