तारक मेहता मालिकेतील लीड एक्ट्रेस दिशा वाकानीची ही अवस्था पाहिलीत का?
भारतातील असे घर सापडणे कठीणच असेल जिथे तारक मेहता का उल्टा चश्मा हा कार्यक्रम पाहिला गेला नाही. याचे कारण म्हणजे ही सिरीयल खूपच जुनी आहे आणि यातील कलाकारांच्या नैसर्गिक अभिनययामुळे ही मालिका खूपच लोकांच्या पसंतीस उतरली होती.
मात्र गेल्या अनेक वर्षांपासून दयाबेनची भूमिका या मालिकेत साकारणारी अभिनेत्री दिशा वाकाने या सिरीयल मध्ये दिसत नाहीये आणि यामुळेच तिच्या चाहत्यांना तिची खूपच आठवण येत आहे. काही काळापूर्वी तिच्या चाहत्यांना असे वाटत होते की ती लवकरच आता मालिकेत कमबॅक करणार आहे. परंतु ती शक्यता देखील आता धूसर झाल्याचे समजत आहे.
एकीकडे तिच्या फॅन्सला ती मालिकेत परत कमबॅक करेल अशी शक्यता वाटत आहे, तर दुसरीकडे अखेर तिने ही मालिका का सोडली हा मोठा प्रश्न देखील पडला आहे. पण अखेर या मागचे खरे कारण समोर आलेले आहे. दिशाने ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही सीरियल सोडण्यामागचे कारण तिचा पती असल्याचे समजत आहे.
View this post on Instagram
तारक मेहता ही सिरीयल सोडून दिशा वाकानीला जवळपास पाच वर्षे पूर्ण झाली आहे. पण अजूनही तिचे फॅन्स ती मालिकेत परत येण्यासाठी वाट पाहताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर दिशाचा एक फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे आणि हा फोटो पाहून तिचा चाहत्यांना राग अनावर होत आहे. खरं पाहता तिच्या एका फॅनने तिचा हा फोटो पोस्ट केलेला आहे, ज्यामध्ये ती एका मुलासोबत दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पोस्टमध्ये दिशाची प्रकृती खूपच वाईट असलेली दिसत आहे. यामुळेच तिच्या फॅन्सने तिच्या या वाईट अवस्थेसाठी तिच्या नवऱ्याला जबाबदार धरून राग व्यक्त केलेला आहे.
इन्स्टा हँडल वरती शेअर करण्यात आलेल्या या फोटोमध्ये दिशाला तिच्या या नो मेकअप नो फिल्टर अवतारात ओळखणं कठीण बनल आहे. दिशाच वजन देखील गेल्या काही वर्षांपेक्षा खूपच वाढलेल दिसून येत आहे. त्यामुळेच तिचा हा फोटो पाहून कोणीही म्हणू शकत नाही की ती तारक मेहता का उल्टा चश्मा मध्ये दयाबेन ची भूमिका साकारणारी दिशा वाकानी आहे असं! तिचा हा फोटो पाहून फॅन्स म्हणत आहेत की दिशाच्या वाईट अवस्थेला तिचा नवरा सर्वस्वी जबाबदार आहे. तर एका
चाहत्याने प्रतिक्रिया देताना लिहिलं आहे की तिच्या पतीने तिचं करिअर बरबाद केलं तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने राग व्यक्त करताना प्रतिक्रिया दिली आहे की, अभिनेत्री पती आणि मुलांमध्ये अडकून बसली आहे!