प्रसिद्ध कलाकार समीर चौगुले यांच्या पत्नीला पाहिलात का? ती हि आहे एक प्रसिद्ध..
महाराष्ट्राची हास्यजत्रा हा छोट्या पडद्यावरील एक असा शो आहे ज्याने अख्ख्या महाराष्ट्राला आपल्या विनोदाने लोकांना चाहत्यांना पोट धरून हसायला लावणारा विनोदवीर म्हणजे समीर चौगुले. मराठी सिनेसृष्टीत आजवर त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने सिनेमा आणि नाटकात छोट्या मोठ्या पण प्रभावी भूमिका साकारत त्याने आज स्वतःची अशी ओळख निर्माण केली आहे. कलाविश्वासोबतच तो सोशल मीडियावरही समीर चौगुले नेहमीच सक्रिय असतो. त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट वरून कायम त्याच्या आयुष्यातील छोटे मोठे क्षण शेयर करत असतो. पण अलीकडे त्याने शेयर केलेली एक पोस्ट चांगलीच व्हायरल होते आहे.
त्याने केलेली ही पोस्ट समीरने खास त्याच्या पत्नीसाठी शेयर केली आहे जी चाहत्यांना भावते आहे. झाले असे की त्याच्या पत्नीचा नुकताच वाढदिवस झाला. त्याने यानिमित्ताने त्याचा आणि तिचा एक फोटो शेअर केला असून एक खास संदेश लिहिला आहे. त्याने लिहिले आहे की, Happy birthday kavita…..काय बोलू!! मला माहितीय फार अलंकारिक लिहिलं की तू बोअर तू होतेस… इतकंच म्हणतो.. आयुष्यात तुझ्याशिवाय माझं अडणं…पान ही न हलणं हे असंच कायम राहू दे.. तुझं असणं = माझं जगणं…. wife’s birthday..My dear wife. Love you forever…..
समीरची ही पोस्ट त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असून त्याची पत्नी ही दिसायला खूपच सुंदर आहे. तसेच ‘तुमची जोडी आम्हाला खूपच आवडली’ असे त्याचे चाहते त्याला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.
विविध स्कीट्सच्या माध्यमातून समीर रसिकांचं मनोरंजन करतो. त्याचं कॉमेडीचं भन्नाट टायमिंग आणि विविध भूमिका रसिकांना कायम भावतात. कोणतंही स्कीट सादर करताना स्टेजवरील एनर्जी, आपल्या सहकलाकारासह असलेलं त्याचं ट्युनिंग यामुळे तो रसिकांना खळखळून हसवतो.
छोट्या पडद्यावरील विविध मालिका, सिनेमा आणि कॉमेडी शोच्या माध्यमातून समीर चौगुलेने रसिकांचं मनोरंजन केलं आहे. ‘फू बाई फू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या शोच्या माध्यमातून समीर चौगुले हे नाव घराघरात पोहचले आहे. विविध नाटकांमध्येही वैविध्यपूर्ण भूमिका साकारत समीर चौगुलेने रसिकांची मनं जिंकली आहेत.
त्याने आजवर ‘कायद्याचं बोला’, ‘आजचा दिवस माझा’, ‘मुंबई मेरी जान’, ‘वक्रतुंड महाकाय’, ‘पेईंग घोस्ट’, ‘मुंबई टाइम’ आणि ‘विकून टाक’ या मराठी चित्रपटांमध्ये उठावदार भूमिका साकारल्या आहेत. सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रामधील त्याचे स्कीट तुफान लोकप्रिय असतात.