नर्गिसच्या नातीला बघितलं का..? दिसते खूपच सुंदर..अमेरिकेत असते सध्या…

0

मित्रहो या कलाविश्वात अनेक नावाजलेली कुटुंबे कार्यरत आहेत, त्यांच्या पिढ्यानपिढ्या पडद्यावर झळकत असतात. तुम्हाला अभिनेत्री नर्गिस माहीतच असेल, नर्गिस म्हणलं की सुंदरतेची आणि अभिनयाची एकत्र झालेली जुळणी आठवते. तिच्या चेहऱ्यावर वरचे अगम्य भाव आजही रसिकांना कोड्यात टाकतात. नर्गिस तिच्या प्रोफेशनल लाईफ हुन अधिक पर्सनल लाईफ मुळे चर्चेचा विषय बनली आहे. तिच्या आयुष्यात येणारे मुखवटे तिला प्रत्येक वेळी एका निराळ्याच रस्त्यावर घेऊन गेले व तिची जीवनकथा एक खुली ‘किताब बनून राहिली.

नर्गिस दत्तने या सिनेसृष्टीला एका पेक्षा एक उत्कृष्ट चित्रपट बहाल केले आहे. त्याकाळातील ती एक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून नावारूपाला आली होती. तिने सुनील दत्त सोबत आपली लग्नगाठ बांधली होती. “तलाश-ए-हक” या चित्रपटातून तिने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. तिचा जन्म पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे झाला होता, तिचा सर्वात गाजलेला चित्रपट “मदत इंडिया” हा आहे. या चित्रपटातील गाणी आणि कथा आजही लोकांच्या ओठांवर तरळत असतात. त्यातील तिने साकारलेली आई आजदेखील लोकप्रिय आहे.

१९५७ मध्ये तिला अकादमी पुरस्कार मिळाला होता, तसेच “रात और दिन” चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.  अभिनयाची प्रशंसा राखणारी नर्गिस आता मात्र या जगात नाही. तिच्या अनेक आठवणी सतत ताज्या होत असतात, विशेष म्हणजे तिची त्यांची मुलं आणि नातवंड नेहमीच चर्चेत असतात. बॉलिवूड सुपरस्टार संजय दत्त प्रत्येक वेळी एका नव्या विषयात सहभागी असतो, संजयने देखील अनेक चित्रपटात काम केले असून आपल्या आई सारखेच अभिनयाच्या क्षेत्रात नाव कमावले आहे. सोबतच त्याची रेलचेल सुद्धा भरपूर प्रमाणात वाढली आहे.

संजयची मुलगी आणि नर्गिसची नात त्रिशाला सोशल मीडियावर विशेष सक्रिय असते, ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असते. ती इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय असते, अनेक फोटो ती नेहमी शेअर करत असते. तिच्या फोटोवर अनेकजण निरनिराळ्या कमेंट्स करत असतात, सोबतच तिच्या ग्लॅमरस फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत असतो. तिने २०१९ मध्ये तीचा प्रियकर गमावला होता आणि याच कारणाने ती प्रचंड डिप्रेशन मध्ये गेली होती. मात्र हळूहळू ती पुन्हा ठीक झाली व तिचे आयुष्य जगू लागली.

त्रिशालाला त्यावेळी अनेकांनी आधार दिला होता, तिचे चाहते देखील तिला सपोर्ट करत होते. संजय दत्त आणि तिचे नाते खूप गोड आहे, बाप लेक तर आहेतच पण सोबतच ते दोघे एकमेकांचे चांगले मित्र सुद्धा आहेत. संजय नेहमीच आपल्या मुलीसोबत फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्या दोघांच्याही भावी आयुष्याला भरपूर शुभेच्छा. त्रिशाला नेहमी अशीच लोकप्रिय राहो ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप