या प्रसिद्ध कलाकारांच्या घरचा बाप्पा पाहिलात का?
बाप्पा आला आनंद झाला.. म्हणत गणरायाचा गजर सर्वत्र ऐकायला मिळत आहे. अनेकांनी आरास रचत बाप्पाचं स्वागत केलं. सेलिब्रिटीज च्या घरी देखील बाप्पांचं दणक्यात स्वागत झाल्याचे फोटोज् आणि व्हिडिओज व्हायरल होत आहेत. अभिनेत्रींचे खास गणेश चतुर्थी स्पेशल फोटोशूट, लूक्स पाहून तर अनेक चाहते घायाळ झाले आहेत. गेल्या २ वर्षात कोणालाच उत्साहात बाप्पाचे स्वागत करता आले नाही. पण या वर्षी अगदी नव्या जोमाने बाप्पाचे स्वागत करण्यात कोणीच कसूर बाकी ठेवली नाही. आणि ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पाला घरी घेऊन आले.
दरम्यान, सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटीज नी आपापल्या घरी कशा पद्धतीने बाप्पाचे स्वागत केले त्याचे फोटोज् आणि व्हिडिओज शेयर केले आहेत. तुम्हीही जाणून घ्या तुमच्या कोणत्या लाडक्या कलाकाराने कसं बाप्पाचं स्वागत केलं?
सोनाली कुलकर्णी
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही नेहमीच तिच्या खास अंदाजासाठी ओळखली जाते. महाराष्ट्राच्या या अप्सरेने अगदी खास पद्धतीने बाप्पाला आपल्या घरी विराजमान केले.तिने स्वतःच्या हाताने बाप्पाची मूर्ती घडवली आहे.
या मूर्तीत दोन गणेश मूर्ती दिसून येत आहेत. ज्यामध्ये एका मूर्तीच्या हातात मोदक आहे ज्याला बाप्पाने कवटाळले आहे तर दुसऱ्या मूर्तीमध्ये बाप्पा गालाला हात लावलेला दिसून येत आहे.
श्रुती मराठे
छोटया पडद्यानंतर मोठ्या पडद्यावर आपल्या अदाकारीने प्रेक्षकांच्या मनात खास जागा मिळवणाऱ्या श्रुतीने अगदी धूम धडाक्यात बाप्पाचे स्वागत केले. तिने शेयर केलेल्या फोटोत ती गौरव घाटणेकरसोबत बाप्पासोबत उभी असलेली दिसत आहे.
अभिजित खांडेकर
माझी नवऱ्याची बायको मालिकेतून छोट्या पडद्यावर एक कुचकामी नवरा म्हणून प्रसिद्ध झालेल्या अभिनेता अभिजित खांडॆकरने देखील बाप्पासोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्याने पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे ज्यात तो संस्कृतीचे दर्शन घडवत आहे.
सिद्धार्थ चांदेकर
क्लासमेट फेम सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर या जोडप्याने देखील बाप्पाचे आपल्या नवीन घरात थाटामाटात स्वागत केले आहे. त्यांनी शेयर केलेल्या फोटोत पारंपरिक वेशात अतिशय सुंदर दिसत आहेत. बाप्पाची आरास उत्कृष्ट पद्धतीने रचलेली असून अतिशय आकर्षक दिसत आहे.
वीणा जामकर
अभिनेत्री विणा जामकरने आपल्या घरी बाप्पाचे स्वागत केले आहे. साडी परिधान करून बापाकडे भक्तीने पाहत असलेला फोटो तिने सोशल मीडियावर शेयर केला आहे.