छोट्या पडद्यावर अनेक कलाकार कमबॅक करतात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे दीपा परब.. तुम्हाला माहित आहे का? तिचा नवरा नावाजलेला अभिनेता अंकुश चौधरी आहे. दरम्यान, त्यांची लव्ह स्टोरी तशी हटके आहे पण आता त्यांचा मुलगा चर्चेत येताना दिसतो आहे.
दरम्यान, दीपा चौधरीने मुलगा प्रिंससोबतचे फोटो शेअर करत कॅप्शन दिले की, पाहता पाहता ९ वर्ष सरली. दोन हातांच्या घडीत मावणारं इवलूस बाळ मला ‘तू चाल पुढं’ म्हणण्याइतपत कधी इतकं मोठ झालं कळलच नाही. प्रिंस, तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो, तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो आणि त्याचा सुगंध तुझ्या संपूर्ण जीवनात दरवळत राहो, हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त, ईश्वरचरणी प्रार्थना ! Happiest Birthday My Love “तिच्या या पोस्ट वर अनेकांनी त्यांच्या मुलाला शुभेच्छा दिल्या.
दरम्यान,दिपा लग्नानंतर खूपच कमी चित्रपटात आपल्याला पाहायला मिळते. शेवटची ती अंड्याचा फंडा या चित्रपटात दिसली होती.
अभिनेत्री दीपा परब ही ‘तू चालं पुढं’ या मालिकेत झळकताना दिसत आहे. झी मराठीवरील या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला दगडी चाळ २ हा चित्रपट टीव्हीवर प्रक्षेपित करण्यात आला. यानिमित्ताने अनेक ठिकाणी प्रमोशनचे होर्डिंग्स लावण्यात आले होते. याबद्दल अंकुश चौधरीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्याने पत्नी दीपालाही टॅग केले आहे.
View this post on Instagram
अंकुश चौधरीने शेअर केलेल्या या व्हिडीओत प्लाझा चित्रपटगृह ते दादरच्या टिळक ब्रीज परिसर पाहायला मिळत आहे. यात त्याने त्याच्या दीपाच्या तू चालं पुढं या मालिकेचे लावलेले होर्डिंग आणि त्याच्या दगडी चाळ २ या चित्रपटाचे लावलेले होर्डिंग पाहायला मिळत आहे. याला त्याने फार हटके कॅप्शन दिले आहे.
View this post on Instagram
“शिवाजी मंदीर नाट्यगृहापासून सुरु झालेला दोघांचा प्रवास ते प्लाझाला प्रिमियर झालेले आमचे चित्रपट आणि आता या दादरच्या टिळक ब्रिज वर दोघांचेही एकाचवेळी होर्डिंग्ज.. कायम लक्षात राहाणारा क्षण… आम्ही एकमेकांना नेहमी सांगत आलोय…. “तू चाल पुढं“…”, असे अंकुश चौधरीने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
सध्या दिपाची तू चाल पुढे ही मालिका खूप लोकप्रिय होताना दिसत आहे. मालिकेचे कथानक चाहत्यांना भावत आहे. आता ती मालिकेत अडचणींना कशी सामोरी जाते हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.