केळवण तर झालं आता लग्न कधी? हार्दिक जोशीच्या पोस्टवर केले चाहत्यांनी प्रश्न..
तुझ्यात जीव रंगलाची हिट जोडी म्हणजे सगळ्यांच्या लाकड्या पाठक बाई आणि राणा दा. ही जोडी आता लवकरच आयुष्यभरासाठी एकत्र येणार आहे.
मे रोजी अक्षयतृतीयाचा मुहूर्त साधून अक्षया आणि हार्दिक यांनी अचानक कोल्हापुरात साखरपुडा करून चाहत्यांना सुखद धक्का दिला त्यांच्या साखरपुड्याची बातमी त्यांनी इतकी अचानक सांगितली की चाहतेही दंग झाले. हार्दिक आणि अक्षयाच्या साखरपुडयाचे फोटो खूपच व्हायरल झाले होते.
सध्या या दोघांच्या लग्नाची तयारी सुरू आहे. गेल्या महिन्यातच या जोडीने पुण्यातील एक स्थळ लग्नासाठी निश्चित केलं आहे, याची माहिती त्यांनी सोशल मीडियावर दिली होती. मात्र अजून् त्यांच्या लग्नाची तारीख काही त्यांनी सांगितली नाही. दोघांच्याही चाहत्यांना या जोडीच्या लग्नाचे वेध लागले आहेत.
दरम्यान, दोघांच्या केळवणाची सुरूवात झाली आहे. अभिनेता हार्दीक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या लग्नाची तयारी सुरू झालीये. हार्दिक ने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर केळवणाचे फोटो शेअर करून आपला आनंद शेयर केला आहेत.
View this post on Instagram
सध्या अक्षया तिच्या मित्र मैत्रिणींबरोबर बॅचरल पार्टी करतेय तर हार्दिक त्याच्या कुटुंबियांबरोबर केळवणाची मज्जा घेत आहे. हार्दिकच्या केळवणाची सुरुवात त्याच्या बहिणीकडून सुरू केलं आहे. फोटोत आपल्याला दिसत आहे की, अत्यंत साग्रसंगीत पद्धतीनं त्याच्या केळवणाचा शुभारंभ झाला आहे. केळीच्या पानावर अस्सल महाराष्ट्रीय पद्धतीनं हार्दीकनं केळवणाचा आस्वाद घेतो आहे. ‘बहिणीकडून केळवणाची सुरूवात’, असं कॅपशन देत त्याने हा सुंदर फोटो शेअर केला आहे.
दरम्यान, नवरी होणारी अक्षया देवधर बॅचरल पार्टीचा आनंद घेत आहे. अक्षयानं काही हटके पद्धतीत ही पार्टी केलीय. सध्या ती मित्र मैत्रिणींबरोबर आऊटींगला गेली असून लग्नाआधीच्या काही खास क्षणांना ती अगदी मनमुरादपणे आनंद लुटत आहे. अक्षयानं केलेली पार्टी साधी सुधी नाही तर खास साऊथ इंडियन स्टाईलमध्ये होती. ज्याचे फोटोज् अर्थात व्हायरल झाले आहेत.
हार्दिकच्या केळवणाचे फोटो पाहून चाहत्यांना त्यांच्या आता त्यांचे लग्न कधी होतंय असे झाले आहे, त्यामुळे हे फोटो पाहून चाहत्यांनी त्याला आता लग्न कधी? असे अनेक प्रश्न विचारले आहेत. दरम्यान हार्दीक जोशी बिग बॉस मराठी ४ मध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र आता जर तो केळवण करत असेल तर बिग बॉस सुरू होईल तेव्हा त्याचं लग्न होण्याची शक्यता आहे. मग हार्दीक शोमध्ये कसा सहभागी होणार आहे की असा संभ्रम निर्माण झाला आहे.