हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या लग्नाची चालू आहे जय्यत तयारी.. लग्न पत्रिकेचा फोटो झाला व्हायरल…

0

झी मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने चाहत्यांना अक्षरशः वेड लावले होते. या मालिकेतील राणादा आणि पाठकबाई ही जोडी महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रिय झाली. राणादाची भूमिका करणाऱ्या हार्दिक जोशी आणि पाठकबाईं साकारणाऱ्या अक्षया देवधर या जोडीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे. आता ही मालिका संपून अनेक वर्षे उलटली तरीही या मालिकेचे प्रेक्षकांच्या मनातील स्थान आजही अढळ आहे. मालिकेतील रील जोडपे आता रियल मध्ये एकत्र येणार आहेत. लवकरच ते दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत. आणि त्यांच्या लग्नपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर काही वेळातच व्हायरल झाला आहे. ज्यामुळे या दोघांचे चाहते भलतेच खुश झाले आहेत.

अभिनेत्री ऋचा आपटेनं हार्दिक आणि अक्षयाच्या लग्नपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. ऋचा ही हार्दिक आणि अक्षयाची जवळची मैत्रीण आहे. अक्षयाच्या साडी विणण्याच्या कार्यक्रमाला देखील ऋचा उपस्थित होती. ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेमध्ये हार्दिकच्या ट्रेनर-मॅनेजरचे पात्र साकारले होते. तेव्हापासून हार्दिक, अक्षया आणि ऋचा यांची चांगली मैत्री आहे. त्यांचे बरेचसे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

तसेच नुकतेच पुण्यात साडी विणणाऱ्या एका नामांकित कंपनीत अक्षयाच्या लग्नाची साडी विणायला घेतली गेली. या विधीला वधू-वरांकडील निवडक मंडळी उपस्थित होते.खुद्द हार्दिक ने तीच्यासाठी साडी विणण्याचे काम केले. ज्याचे फोटोज् आणि व्हिडिओज देखील व्हायरल झाले होते. अक्षया आणि हार्दिक यांचे लग्न पुण्यात होणार आहे. परंतु लग्नाची तारीख मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.दरम्यान आता अक्षया देवधरने सोशल मीडियावर लग्नाची पत्रिका शेअर केली आहे. खरेतर ही पत्रिका अक्षयाने नाही तर रुचा आपटेने शेअर केली आहे.

अक्षया आणि हार्दिक यांच्या लग्नाची पत्रिका पाहून चाहते त्यांच्या लग्नाबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.अक्षया आणि हार्दिक यांचा ठाण्यात ३ मे रोजी साखरपुडा केला होता. या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का दिला होता.तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते.

हार्दिक आणि अक्षया एकमेकांवरप्रेमाचा वर्षाव करत असतात. आणि त्यांचे हे प्रेम ते सोशल मीडियावर बऱ्याचदा व्हिडीओ आणि फोटो शेअर करून व्यक्त करत असतात. दरम्यान अक्षयाने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांच्या लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. त्यांच्या केळवणाचे फोटोदेखील सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

Leave A Reply

Your email address will not be published.