कोई मिल गया चित्रपटांतून अधिराज्य करणाऱ्या या बोल्ड अभिनेत्रीचा दिमाखदार विवाहसोहळा पडला पार..

सध्या सिने जगतात लग्न सराई चा मौसम सुरू आहे. जिकडे बघाव तिकडे लग्नाची धूम पहायला मिळत आहे. छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय हार्दिक जोशी आणि अक्षयाच्या लग्नाच्या बातमीने चाहते खूपच खुश होते. आणि सध्या आणखी एका सेलिब्रिटीच्या लग्नाची धूम पहायला मिळत आहे.

लहान मुलांचा अगदी आवडता अशा कोई मिल गया’ या चित्रपटात अनेक लहानग्या कलाकारांनी काम केले होते. त्यापैकी एका चिमुकलीच्या लग्नाच्या बातमीने साऱ्या सोशल मीडियाला दणाणून सोडले आहे. कोण आहे ही आठवतेय का? ती चिमुकली आता मोठी झाली असून तिने बिझनेसमन सोहैल कठुरियाशी लग्न केलं आहे. कोई मिल गया या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केल्यानंतर अभिनेत्री हंसिका मोटवानीने बॉलिवूडमधील इतरही चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. मात्र बॉलिवूडपेक्षा जास्त प्रसिद्धी आणि लोकप्रियता तिला साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये मिळाली. हंसिकाने नुकतंच जयपूरमधील मुंडोटा फोर्ट अँड पॅलेस याठिकाणी शाही विवाह सोहळा रचला आहे.

तिच्या या शाही विवाहसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. हंसिकावर चाहत्यांनी शुभेच्छांचा पाऊस पडला आहे. या लग्नसोहळ्याला तिचे कुटुंबीय आणि जवळचे स्नेही उपस्थित होते. या लग्नसोहळ्यात हंसिकाने लाल रंगाचा लेहंगा तर सोहैलने मोती रंगाची शेरवानी परिधान केली. सिंधी विवाहपद्धतीनुसार हा विवाहसोहळा पार पडला.

 

View this post on Instagram

 

A post shared by ihansika_my_jaan❤️ (@ihansika_my_jaan)

दरम्यान, हंसिकाच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनची जय्यत तयारी २ डिसेंबरपासूनच सुरू झाली होती. तर त्यानंतर तिचा मेहंदी आणि संगीत सोहळा दिमाखात 3 डिसेंबर रोजी पार पडला. आणि अखेर ४ डिसेंबर रोजी हंसिका आणि सोहैल विवाहबंधनात अडकले. पिंकविला वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, सोहैलचं हे दुसरं लग्न आहे.

दरम्यान, हंसिका ही बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीमध्ये बालकलाकार म्हणून प्रसिद्धी मिळवली. तिने ‘शका लका बुम बुम’ या मालिकेतून लोकप्रियता मिळवत तिने चाहत्यांच्या मनावर राज्य केले. सोबतच तिने तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by ihansika_my_jaan❤️ (@ihansika_my_jaan)

हंसिका आणि सोहैलच्या लग्नाप्रमाणेच त्याचं मॅरेज प्रपोजलसुद्धा चर्चेचं कारण होत. सोहैलनं चक्क पॅरिसमधील आयफेल टॉवरसमोर हंसिकाला प्रपोज केलं होतं. आणि सध्या हंसिका आणि सोहैल हे बिझनेस पार्टनरसुद्धा आहेत. हंसिकाची इव्हेंट मॅनेजमेंटची कंपनी आहे. याच कंपनीत दोघं पार्टनर आहेत.

ज्या मुंडोता पॅलेसमध्ये हंसिका आणि सोहेल सप्तपदी घेणार आहेत तो पॅलेस ४५० वर्षे जुना आहे. केवळ आतूनच नव्हे तर बाहेरूनही हा पॅलेस पाहण्यासारखा आहे. सध्या हंसिकाच्या लग्नासाठी या पॅलेसची सजावट करण्याचं काम सुरू आहे. जेव्हा हंसिका आणि सोहेलने लग्नाचा निर्णय घेतला तेव्हाच त्यांनी या पॅलेसवर डेस्टिनेशन वेडिंग करण्याचं ठरवलं होतं

Leave a Comment

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप